"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 03:37 PM2024-10-07T15:37:04+5:302024-10-07T15:38:10+5:30

पाकिस्तानात गेलेला भारताचा मोस्ट वॉन्टेड झाकीर नाईक एका पश्तून तरुणीच्या प्रश्नावर जबरदस्त भडकला. एवढेच नाही, तर संबंधित तरुणीचा हा प्रश्न इस्लामवर आरोप असल्याचे म्हणत, झाकीरने तिला माफीदेखील मांगायला सांगितले.

Zakir Naik was furious at the Pashtun girl's question in pakistan | "इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला

"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला

धार्मिक कार्यक्रमांसाठी पाकिस्तानात गेलेला भारताचा मोस्ट वॉन्टेड झाकीर नाईक एका पश्तून तरुणीच्या प्रश्नावर जबरदस्त भडकला. एवढेच नाही, तर संबंधित तरुणीचा हा प्रश्न इस्लामवर आरोप असल्याचे म्हणत, झाकीरने तिला माफीदेखील मांगायला सांगितले. झाकीर नाइक 28 ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तान दौऱ्यावर आहे.

पाकिस्तानात एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान संबंधित तुरुणीने झाकीर नाइकला प्रश्न केला. तरुणीने विचारले, "मी ज्या भागातून येते, तिथील लोक स्वतःला कट्टर इस्लामिक म्हणवतात, मात्र, तेथे लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होतात. मुलींना घरातून बाहेर पडू दिले जात नाही."

आधी माफी मागा - झाकीर नाइक
तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाइक जबरदस्त भडकला अन् उत्तर देण्याऐवजी त्याने तिला माफी मागायला सांगितली, तो म्हणाला, "आपण चुकीचे बोलत आहात. मुस्लिम कधीही मुलांवर लैंगिक अत्याचार करू शकत नाही, आपण इस्लामवर आरोप करत आहात. आधी माफी मागा."

"लोक अत्यंत धार्मिक आहेत, पण..." -
संबंधित तरुणी झाकीर नाइकला म्हणाली, "मी अशा भागातून येते, जेथे पश्तो बोलली जाते. मी ज्या भागातून येते तेथे पूर्णपणे इस्लामिक सोसायटी आहे. तेथील महिला कारण असल्याशिवाय घराबाहेरही पडत नाहीत. दर रीशुक्रवारी तब्लीगी जमातच्या लोकांचे बयानही होते. काही दिवसांपूर्वी तेथे एक मोठा तब्लीगी इज्तिमादेखील झाला. आमच्या भागातील लोक अत्यंत धार्मिक आहेत. मात्र काय कारण असू शकते की, तेथे ड्रग्ज अॅडिक्शन आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण (Peadophile), व्याज घेणे आदी वाईट गोष्टी सर्रासपणे चालत आहेत. तिथील समाज का विघटित होत आहे? मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना उलेमा का समजावत नाहीत?"

तरुणीच्या या प्रश्ननावर भडकत झाकीर नाईक म्हणाला, "आपण जो प्रश्न केला आहे, त्यात विरोधाभास आहे. कुठल्याही इस्लामिक वातावरणात पीडोफाइल होऊ शकत नाही. हे शक्य नाही. यामुळे चुकीच्या प्रश्ननाबद्दल आपल्याला माफी मागायला हवी. आपल्याला स्वीकारावे लागेल. आपण इस्लामवर आरोप करत आहात आणि माफी मागायलाही तयार नाही..." 

Web Title: Zakir Naik was furious at the Pashtun girl's question in pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.