झिका विषाणूंचा २३ देशांत फैलाव
By admin | Published: January 30, 2016 12:03 AM2016-01-30T00:03:45+5:302016-01-30T00:03:45+5:30
जगभरातील २३ देशांना जीवघेणा विळखा घालणाऱ्या ‘झिका’ विषाणंूचा अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असून बारा महिन्यांत ३० ते ४० लाख लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे
Next
वॉशिंग्टन : जगभरातील २३ देशांना जीवघेणा विळखा घालणाऱ्या ‘झिका’ विषाणंूचा अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असून बारा महिन्यांत ३० ते ४० लाख लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. मार्गारेट चॅन यांनी सांगितले. झिकाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, असे चॅन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मंडळाच्या बैठकीत सांगितले.