झिका विषाणू बाधित मुलाचा स्पेनमध्ये जन्म
By admin | Published: July 26, 2016 02:50 AM2016-07-26T02:50:09+5:302016-07-26T02:50:09+5:30
स्पेनमध्ये एका झिका विषाणूने बाधित महिलेने अविकसित मेंदूच्या बालकास जन्म दिला. ही घटना सोमवारी घडली. युरोप खंडातील ही पहिलीच घटना आहे. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
Next
माद्रिद: स्पेनमध्ये एका झिका विषाणूने बाधित महिलेने अविकसित मेंदूच्या बालकास जन्म दिला. ही घटना सोमवारी घडली. युरोप खंडातील ही पहिलीच घटना आहे. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिलेची प्रसूतीपूर्व चाचणी झाली होती. त्यामध्ये अर्भकास मॅक्रोसेफेली आजार असल्यामुळे त्याच्या मेंदूची वाढ खुंटल्याचे निर्दशनास आले होते. ४0 आठवड्यानंतर या महिलेची सिझिरीयन प्रसूती करण्यात आली. स्पेनमध्ये आतापर्यंत १९0 झिका विषाणूने बाधित रूग्ण आढळून आले आहेत.