फेसबूक संचालकाच्या भारतविरोधी टिप्पणीमुळे झुकेरबर्ग नाराज

By admin | Published: February 11, 2016 09:52 AM2016-02-11T09:52:51+5:302016-02-11T09:55:37+5:30

फेसबूक कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्य मार्क अँडरसनने भारताबद्दल केलेल्या अपमानास्पद टिप्पणीबद्दल मार्क झुकेरबर्गने नाराजी नोंदवली आहे.

Zuckerberg upset with Facebook's anti-India commentary | फेसबूक संचालकाच्या भारतविरोधी टिप्पणीमुळे झुकेरबर्ग नाराज

फेसबूक संचालकाच्या भारतविरोधी टिप्पणीमुळे झुकेरबर्ग नाराज

Next
>ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. ११ - भारतातील टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीने (ट्राय) नेट न्यूट्रॅलिटीच्या बाजूने कौल दिल्याने फेसबूकला मोटा झटका बसला आहे. फ्री बेसिक्सची महत्त्वाकांक्षी योजना अडकल्याचे शल्य डाचत असल्याने फेसबूक कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्य मार्क अँडरसनने भारताबद्दल अतिशय अपमानास्पद टिप्पणी करत आपला राग व्यक्त केला आहे. ' हा निर्णय वसाहतवादी धोरणांच्या विरोधात असून भारत जर ब्रिटीशांच्या सत्तेखाली असता तर त्याचे कल्याण झाले असते' असे अपमानास्पद ट्विट केले. मात्र फेसबूकचा सहसंस्थापक मार्क झुकेरबर्गने मार्क अँडरसनच्या या वक्तव्यावर तीव्र नाराजी दर्शवत आपण त्याच्याशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र अँडरसनच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतापाची तीव्र भावना आहे.
सिलिकॉन व्हलीतील अतिशय मोठे प्रस्थ असलेले मार्क अंडरसन हे फेसबुकच्या संचालक मंडळात असून फ्री बेसिक्स भारतात लागू करता आले नाही याचा राग त्यांच्या मनात आहे. ' इंटरनेट टेरिफबाबत भारताचा निर्णय योग्य नाही. हा देश ब्रिटिश अमलाखाली असता तर त्याची स्थिती अधिक चांगली असती. वसाहतवादाला विरोध केल्याने कित्येक दशकांपासून भारताचे आर्थिक नुकसान झाले आहे. मग आता हा विरोध कशासाठी?' असे ट्विट त्यांनी केले. मात्र सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागताच त्यांनी तातडीने हे ट्विट काढून टाकले. 
मार्क झुकेरबर्गने मात्र या सर्व टिप्पण्यांबाबत असहमती दर्शवत आपली नाराजी स्पष्ट केली. ' मार्क अँडरसनची ही कॉमेंट अतिशय दु:खदायक असून मी वा फेसबूक (कंपनी) अशा प्रकारे कोणताही विचार करत नाही' असे त्याने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले. ' फेसबूक लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी व त्यांचे भविष्य घडवण्यासाठी मदत करतं' असंही त्याने म्हटले आहे. 
 

Web Title: Zuckerberg upset with Facebook's anti-India commentary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.