मस्क यांचे ट्विटर राेखण्यासाठी झुकेरबर्गची ‘थ्रेड्स’ उतरणार मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 09:00 IST2023-07-05T08:59:43+5:302023-07-05T09:00:14+5:30
झुकेरबर्ग यांचे ‘इन्स्टाग्राम’ ६ जुलै राेजी ‘थ्रेड्स’ हे ॲप लाॅंच करणार आहे.

मस्क यांचे ट्विटर राेखण्यासाठी झुकेरबर्गची ‘थ्रेड्स’ उतरणार मैदानात
वाॅशिंग्टन : ट्विटरचे मालक इलाॅन मस्क आणि मेटाचे साईओ मार्क झुकेरबर्ग प्रत्यक्षात भिडणार आहेतच. मात्र, साेशल मीडियाच्या उद्याेगातही हे दाेघे आमनेसामने येणार आहेत. झुकेरबर्ग यांचे ‘इन्स्टाग्राम’ ६ जुलै राेजी ‘थ्रेड्स’ हे ॲप लाॅंच करणार आहे. ते ट्विटरला स्पर्धा देणार आहे. थ्रेड हे टेक्स्ट अर्थात मजकुरावर आधारीत ॲप राहणार आहे. ट्विटरप्रमाणेच थ्रेड्सवरही अक्षर मर्यादा असेल. ती किती, याबाबत माहिती समाेर आलेली नाही. (वृत्तसंस्था)
इन्स्टाग्राम वापरकर्ते थ्रेडवर लाॅगिन करू शकतील.
इन्स्टाग्रामवर ज्यांना फाॅलाे करता, त्यांना थ्रेड्सवरही फाॅलाे करता येईल.
ताज्या घडामाेडी तसेच ट्रेंडिंग विषयांवर चर्चादेखील करता येईल.
वापरकर्ते त्यांच्या कल्पना आणि मते थ्रेड्सवर शेअर करू शकतील.