नियमांचे उल्लंघन करणारे २५ हजार ६४६ चालक कारवाईच्या कचाट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:21 AM2019-12-30T00:21:40+5:302019-12-30T00:22:27+5:30
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४ हजार ६४६ वाहन चालकांवर शहर वाहतूक शाखेने चालू वर्षात कारवाई केली आहे. संबंधित वाहन चालकांकडून ५४ लाख ५१ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जालना : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४ हजार ६४६ वाहन चालकांवर शहर वाहतूक शाखेने चालू वर्षात कारवाई केली आहे. संबंधित वाहन चालकांकडून ५४ लाख ५१ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक शाखेने नियम मोडणाºया चालकांवर कारवाई केली असली तरी वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.
उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या जालना शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखा कार्यरत आहे. पोलीस निरीक्षकांसह इतर अधिकारी, कर्मचारी विविध ठिकाणी थांबून वाहतुकीवर नियंत्रण ठेवतात. या दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया चालकांवर कारवाई करून दंडही आकारला जातो. चालू वर्षात एकूण २४ हजार ६४६ चालकांवर कारवाई करून ५४ लाख ५१ हजार ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यात जानेवारी महिन्यात १५२६ चालकांवर कारवाई करून ३ लाख ५८ हजार ३०० रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्यात १४०९ चालकांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांकडून ३ लाख १७ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. मार्च महिन्यात २१०१ चालकांवर कारवाई करून ४ लाख ८८ हजार ५०० रूपयांचा दंड आकारण्यात आला. एप्रिल महिन्यात १०१२ चालकांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांवर २ लाख १६ हजार ९०० रूपयांचा दंड लावण्यात आला. मे महिन्यात १७०५ चालकांवर कारवाई करून ३ लाख ५८ हजार ८०० रूपयांचा दंड आकारण्यात आला. जून महिन्यात २८३५ चालकांवर कारवाई करण्यात आली. तर संबंधित चालकांवर ६ लाख १० हजार ४०० रुपयांचा दंड लावण्यात आला. जुलै महिन्यात २०१२ चालकांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांवर ४ लाख ३५ हजार ५०० रूपयांचा दंड आकारण्यात आला. आॅगस्ट मध्ये २२८२ चालकांवर कारवाई करून ५ लाख २० हजार ७०० रूपयांचा दंड ठोकण्यात आला. सप्टेंबरमध्ये १६९३ चालकांवर कारवाई झाली. तर त्यांना ३ लाख ७३ हजार ४०० रूपयांचा दंड आकारण्यात आला. आॅक्टोबर महिन्यात ५६६ चालकांवर कारवाई करून १ लाख २८ हजार ८०० रूपयांचा दंड आकारण्यात आला. नोव्हेंबर मध्ये ४१३५ चालकांवर कारवाई करून ९ लाख ७ हजार १०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक शाखा नियम मोडणाºया वाहन चालकांवर कारवाई करीत असली तरी नियम धाब्यावर बसविणाºया चालकांची संख्याही कायम आहे. त्यामुळे शहर वाहतूक विस्कळीतच दिसून येते.