महिलांसाठी १० सखी मतदान केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:06 AM2019-04-23T01:06:13+5:302019-04-23T01:07:03+5:30

लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करण्यासाठी २ हजार मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात १० सखी मतदान केंद्रे राहणार आहे.

10 voting centers for women | महिलांसाठी १० सखी मतदान केंद्रे

महिलांसाठी १० सखी मतदान केंद्रे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करण्यासाठी २ हजार मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात १० सखी मतदान केंद्रे राहणार आहे.
जालना लोकसभा मतदार संघात मंगळवारी मतदान होणार आहे. १८ लाख मतदार २ हजार मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत. मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास ९ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागातर्फे चार टप्प्यात मतदान प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातील दहा मतदान केंद्रे यंदा प्रथमच महिलांच्या हाती देण्यात आली आहेत. या मतदान केंद्रावर महिला कामकाज पाहणार आहेत. या मतदान केंद्राला सखी असे नाव देण्यात आले आहे.
यात जालना विधानसभा मतदार संघातील सेंट मेरी हायस्कूल, बदनापूर येथील जि.प. प्रा. शाळा दूधनवाडी, भोकरदन येथील मुलींची जि.प. प्रा. शाळा, जि.प. प्रा. शाळा पिंपळखुटा, सिल्लोड विधानसभा मतदार संघातील जोहर उर्दू शाळा, खोली क्र. १ आणि २, फुलंब्री विधानसभा मतदार संघासह अन्य ठिकाणी ही केंद्र राहणार आहेत.
मतदान प्रक्रियेवर राहणार थेट नजर
जालना : जालना जिल्ह्यात ३९ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे की नाही, हे पाहण्यासाठी १६८ केंद्रावर थेट लाईव्ह वेब कॉस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जालना लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. यात ३९ संवेदनशील मतदान केंद्रावर प्रत्येकी एक अशा ३९ फोटोग्राफरची व्यवस्था करण्यात आली आहे. या १६२ मतदान केंद्रातील निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात, राज्यनिवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्त असा तीन ठिकाणी तीन मोठे टीव्ही लावल्या जाणार आहे.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरात दारुबंदी करण्यात आली आहे. कोणीही अवैधपणे दारु विक्री करतांना आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरात कोम्बींग आॅफरेशन करण्यात येत आहे. रात्री दहानंतर फिरणा-यांची कसून चौकशी होणार आहे.
निवडणुकीसाठी वाहने रवाना

जालना लोकसभेची निवडणूक मंगळवारी होत आहे. यासाठी सोमवारी २२५ बसेस साहित्य घेऊन गावोगावी रवाना झाल्या आहेत. यापूर्वी निवडणूक विभागाच्या कर्मचा-यांनी मतपत्रिका घेऊन बसमध्ये चढण्यासाठी गर्दी केली होती. दुसºया छायाचित्रात काही स्कूल बसचा देखील यासाठी उपयोग करण्यात आला. तर ६७४ जिप्स, ०३ टेम्पो, ट्रव्हलर १२ असे एकूण ९१४ वाहने साहित्य घेऊन विविध मतदान केंद्रावर सोमवारी सायंकाळी रवाना झाली. या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे.

Web Title: 10 voting centers for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.