जाफराबाद तालुक्यातील १०५ वीज कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:57 AM2021-02-05T07:57:25+5:302021-02-05T07:57:25+5:30

शासनाच्या खाजगीकरणाच्या विरोधात बुधवारी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. १०५ कर्मचारी संपात सहभागी झाल्याने ग्रामीण भागात ...

105 power workers on strike in Jafrabad taluka | जाफराबाद तालुक्यातील १०५ वीज कर्मचारी संपावर

जाफराबाद तालुक्यातील १०५ वीज कर्मचारी संपावर

Next

शासनाच्या खाजगीकरणाच्या विरोधात बुधवारी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. १०५ कर्मचारी संपात सहभागी झाल्याने ग्रामीण भागात विजेची समस्या निर्माण झाली होती.

विद्युत मंडळाचे कर्मचाऱ्यांच्या आठ प्रमुख मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मध्ये विद्युत संशोधन बिल व स्टँडर्ड बिलिंग, अस्तित्वात असलेल्या फ्रेंचिंसी, खाजगीकरण प्रक्रिया रद्द करण्यात यावी, नवी पेंशन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी, सक्तीचे सेवानिवृत्ती प्रवधान, कंत्राकी कामगार यांना कायम करा, नवीन ठेकेदारी पद्धत रद्द करण्यात यावी, रिक्त पदावर कर्मचारी यांची भरती करावी या मागण्यांचा समावेश आहे.

फोटो कॅप्शन -

जाफराबाद तालुक्यातील १०५ वीज कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाचा विरोध म्हणून बुधवारी पुकारलेल्या संपात सहभाग घेतला.

Web Title: 105 power workers on strike in Jafrabad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.