११ कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवा- लोणीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:26 AM2018-08-12T00:26:24+5:302018-08-12T00:26:44+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा ११ कलमी कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून याचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश देत कामात हयगय अथवा कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा ११ कलमी कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून याचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश देत कामात हयगय अथवा कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे
पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.
परतूर येथील पंचायत समिती सभागृहात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा ११ कलमी कार्यक्रमाचा आढावा पालकमंत्री लोणीकर यांनी घेतला. यात पाणंद रस्ते, नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेचा आढावा त्यांनी घेतला. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, ब्रिजेश पाटील, सुदाम प्रधान, मदनलाल शिंगी, पंजाबराव बोराडे, गणेशवराव खवणे, रमेश भापकर, मधुकर खंदारे, पाईकराव, विष्णू फुफाटे, अशोक डोके, किशोर हनवते आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा ११ कलमी कार्यक्रम राबविण्यात येतो. या ११ कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याबाबत यापूर्वीच पदाधिकारी, अधिका-यांच्या कार्यशाळा, बैठका घेण्यात आल्या होत्या. परंतू पाहिजे त्या प्रमाणात या कामामध्ये प्रगती नसल्याची खंत व्यक्त करत हा ११ कलमी कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा. या कामात हयगय अथवा दिरंगाई करणा-या अधिकारी, कर्मचाºयांची हयगय केली जाणार नसून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
जालना जिल्ह्यात चार हजार ५०० सिंचन विहिरी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते व त्या जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. परंतु हे कामही अत्यंत संथगतीने करण्यात येत आहे. परतूर तालुक्यात दोन हजार २०० विहिरींच्या कामांना जिल्हा परिषदेने स्थगिती दिली होती. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून ज्या त्रुटींमुळे ही स्थगीती देण्यात आली होती. त्या त्रुटींची पूर्तता करून येत्या १५ दिवसांच्या आत सिंचन विहिरींची सर्व कामे सुरू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
नानाजी कृषी देशमुख संजीवनी योजनेत जिल्ह्यातील ३६३ गावांची निवड करण्यात आली असून, या योजनेची कामेही तातडीने सुरु करण्याच्या सुचना देत पालकमंत्री लोणीकर यांनी अहिल्यादेवी सिंचन विहिर, अमृतकुंड शेततळे, भू-संजिवनी, भू-संजीवनी कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डे, समृद्ध गाव तलाव, अंकुर रोपवाटीका, नंदन वन वृक्ष लागवड, समृद्ध ग्राम योजना या योजनांचा तालुकानिहाय तहसिलदार, गटविकास अधिकारी व उपविभागीय अधिका-यांनी आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.