ग्रामीण भागातील ११२ रस्त्यांचे उजळणार भाग्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:27 AM2019-07-05T00:27:09+5:302019-07-05T00:27:30+5:30
ग्रामीण भागाला जोडणाऱ्या जिल्ह्यातील ११२ रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खड्ड्यांनी ग्रासलेल्या या रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ग्रामीण भागाला जोडणाऱ्या जिल्ह्यातील ११२ रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खड्ड्यांनी ग्रासलेल्या या रस्त्यांचे भाग्य उजळणार असून, वाढलेले अपघाताचे प्रमाणही कमी होणार आहे.
जिल्ह्यातील गावा-गावांना जोडणाºया रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यांवरुन वाहने चालवणे म्हणजे चालकांसाठी कसरतच! रस्त्याची झालेली अवस्था आणि वाढलेले अपघात यामुळे या रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे करण्यात आली होती. जिल्हा परिषदेने निधीसाठी वरिष्ठस्तरावरही पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याला यश आले असून, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ११२ रस्त्यांसाठी ३० कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे. रस्त्यांच्या या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, यावर्षीच या रस्त्यांच्या कामांना सुरूवात होणार असून, तसे नियोजनही करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
जळगाव ते आडगाव, जामखेड ते पाचोड, पिंपरखेड ते अरगडे गव्हाण, किर्तापूर ते किर्तापूर तांडा, हिवरखेडा ते आकणी, टकले पोखरी ते सेवली, श्रीष्टी ते कºहाळा ते ईजिमा, कोकाटे हादगाव ते लिंबी, मंठा टोकवाडी तांडा ते पांगरी खु, भारज पासोडी, भारज ते आढा, धावडा ते नाटवी, पारध खु, कुंभारी ते देवपिंपळगाव, गाढेसावरसागाव ते माळी पिंपळगाव, पाथरवाला बु, पांगरी गोसावी, बाजीउम्रद ते बाजीउम्रद तांडा, दहीगाव ते जळगाव सपकाळ, मोतीगव्हाण ते साळेगाव, खडकावाडी, देवगाव खवणे ते नायगाव, वाढोणा ते रोहिणा, गोळेगाव ते सावंगी, अकोला तांडा, पानशेंद्रा ते श्रीकृष्णनगर, वंजारउम्राद ते दत्तमंदीर, मठारोड ते धोगडे वस्ती, धारकल्याण ते आनदवडी, गाढेसावरगाव ते माळी पिंपळगाव अशा ११२ रस्त्यांची कामे होणार आहेत.