१४ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:44 AM2019-01-20T00:44:55+5:302019-01-20T00:45:38+5:30
हैदराबाद येथून बुलडाण्याकडे गुटखा घेवून जाणाऱ्या वाहनाला सापळा लावून मंठा पोलिसांनी शनिवारी पकडले. यात आयशर चालक शैलेशकुमार यादव (रा. सेवनपूर, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हैदराबाद येथून बुलडाण्याकडे गुटखा घेवून जाणाऱ्या वाहनाला सापळा लावून मंठा पोलिसांनी शनिवारी पकडले. यात आयशर चालक शैलेशकुमार यादव (रा. सेवनपूर, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले.
राज्यात बंदी असलेला गुटखा विक्रीसाठी हैदराबाद येथून बुलडाण्याकडे मंठामार्गे एका आयशर वाहनातून जात असल्याची माहिती मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना मिळाली. या माहितीवरुन त्यांनी कर्मचाºयांसह मंठा- जिंतूर मार्गावरील हॉटेल दर्शनाजवळ सापळा रचला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिंतूरकडून येणारे आयशर वाहन (क्र. टीएन-०७, युएच- १३८४) येताच पोलिसांनी पकडले. यावेळी चालक शैलेशकुमार यादव यास ताब्यात घेऊन वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा पोत्यामध्ये पॅकिंग केलेला आढळून आला. सुमारे १४ लाख रुपयांचा गुटखा आणि १० लाखांचे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्न आणि औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी रात्री उशिरा मंठ्यात दाखल झाले असून, त्यांची फिर्याद नोंदविण्याचे काम सुरु होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोउपनि. नितीन गट्टेवार, कर्मचारी शाम गायके, खलसे, काळे, आढे यांनी केली.