एरंडीच्या बिया खाल्ल्याने १४ विद्यार्थ्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:41 AM2017-12-07T00:41:17+5:302017-12-07T00:42:17+5:30

तालुक्यातील बठाण येथे शाळेच्या परिसरात असलेल्या एरंडी बिया खाल्ल्याने १४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.

 14 students have been poisoned | एरंडीच्या बिया खाल्ल्याने १४ विद्यार्थ्यांना विषबाधा

एरंडीच्या बिया खाल्ल्याने १४ विद्यार्थ्यांना विषबाधा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तालुक्यातील बठाण येथे शाळेच्या परिसरात असलेल्या एरंडी बिया खाल्ल्याने १४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाब सुरू झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. मुलांना तातडीने जालना येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. यात १२ मुले आणि २ मुलींचा समावेश आहे. सर्व मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी सांगितले.
चैतन्य गणेश देवडे (८), पृथ्वीराज वसंत बांदल (८), भक्ती सोपान देवडे (९), गोपाल परमेश्वर देवडे (८), ओंकार प्रधान देवडे (८), प्रतिक रामनाथ देवडे (८), कृष्णा विष्णू बागल (९), दीपक भरत बागल (९), अनिकेत अर्जुन बागल (९), भारती राजेंद्र शिरसाठ (९), प्रशांत राजेंद्र शिरसाठ (६), ओमप्रकाश ऋषिधर पाटेकर (८), ओंकार दत्तात्रय वीर (८), जीवन जनार्दन उजाड (९) अशी विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्वजण जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात. दुपारी सुटी झाल्यानंतर त्यांनी परिसरात असलेल्या एरंडीच्या बिया खाल्या. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना उलट्याा आणि जुलाबचा त्रास सुरू झाला. शिक्षक आणि परिसरातील ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीने विद्यार्थ्यांना जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक मधुकर राठोड यांनी तात्त्काळ उपचार सुरु केले. काही वेळानंतर सगळ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. दरम्यान, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रूग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

Web Title:  14 students have been poisoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.