जाफराबाद तालुक्यातील १५ शाळेची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:50 IST2019-01-12T00:49:58+5:302019-01-12T00:50:33+5:30
पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अतंर्गत शालेय विद्यार्थ्यांना पाणी, निसर्ग, पर्यावरण व जलसंधारण या विषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने तालुक्यातील निवडक पंधरा माध्यमिक शाळांमध्ये ‘निसर्ग धमाल शाळा’ हा उपक्रम राबाविण्यात येत आहे.

जाफराबाद तालुक्यातील १५ शाळेची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अतंर्गत शालेय विद्यार्थ्यांना पाणी, निसर्ग, पर्यावरण व जलसंधारण या विषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने तालुक्यातील निवडक पंधरा माध्यमिक शाळांमध्ये ‘निसर्ग धमाल शाळा’ हा उपक्रम राबाविण्यात येत आहे. जाफराबाद येथील ज्ञानसागर माध्यमिक विद्यालयातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
पाणी फाऊंडेशनच्या या उपक्रमामध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होत असून, यावर्षी राज्यातील ७६ तालुक्यात वॉटर कप स्पर्धा राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्याचा समावेश आहे.
तालुक्यातील पंधरा निवडक शाळांच्या सहभागाने पुढील काळात पाण्याची चळवळ गावा-गावात पोहचविली जाईल. या उपक्रममध्ये खेळ, गाणी, कृती, चर्चा या माध्यमातून मुलांमध्ये पाण्याचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.
जमीनीतील घटत चाललेली पाण्याची पातळी पुर्वरत व्हावी, यासाठी भावी पिढी सगज होऊन निसर्ग, जल, जंगल, जमीन याविषयी जागरुक होणे हा या मागचा उद्देश आहे. यासाठी पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षक परिश्रम घेत आहे.
याकामी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, संस्थाप्रमुख यांचे विशेष सहकार्य मिळत असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक बी. एस. सय्यद व ज्ञानेश्वर इधाटे यांनी दिली. दरम्यान, या स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहे.