१५० कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:40 AM2018-10-10T00:40:59+5:302018-10-10T00:41:51+5:30

भोकरदन तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने तहसील आणि वीजवितरण कंपनीच्या संयुक्त पथकाने सोमवारी कारवाई करून बाणेगाव व चांदई एक्को धरणाच्या परिसरातील ११ रोहित्रासह १५० कृषीपंपाचा वीजपुरवठा बंद केल्याची माहिती तहसीलदार संतोष गोरड यांनी दिली.

150 agricultural power supply breaks | १५० कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित

१५० कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित

Next
ठळक मुद्देभोकरदन तहसीलदाराची कारवाई : बाणेगाव, चांदई धरण परिसर

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने तहसील आणि वीजवितरण कंपनीच्या संयुक्त पथकाने सोमवारी कारवाई करून बाणेगाव व चांदई एक्को धरणाच्या परिसरातील ११ रोहित्रासह १५० कृषीपंपाचा वीजपुरवठा बंद केल्याची माहिती तहसीलदार संतोष गोरड यांनी दिली.
भोकरदन तालुक्यात अत्यल्प पावसामुळे धामणा, जुई मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहे. शिवाय पाझर तलावात पाणीसाठा शिल्लक नाही त्यामुळे बाणेगाव, पद्मावती व चांदई एक्को, पळसखेडा दाभाडी या धरणात थोड्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याचा उपसा होऊ नये यामुळे तालुक्यातील काही गावांना या धरणातून पाणीपुरवठा करण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने तहसीलदार संतोष गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता एस. के. भालेराव राजुरसह तहसील व वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ८ आॅक्टोबर रोजी बाणेगाव धरणाच्या परिसरातील ५ रोहित्राचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे या रोहित्रावरून पाणी उपसा करणाºया ७५ ते १०० वीजपंपाचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. त्याचप्रमाणे चांदई एक्को धरणाच्या परिसरातील ६ रोहित्राचा पुरवठा बंद करण्यात आल्यामुळे ८० ते ९० वीजपंपाची जोडणी खंडीत करण्यात आल्याने, पाणी उपसा थांबणार आहे. धरण अथवा पाझर तलावाच्या परिसरातील विहिरींना मुबलक पाणी आहे. अशा विहिरीचे मोजमाप करण्याचे काम सुरू असून, लवकरच या सर्व विहिरी शासन ताब्यात घेणार असून, नागरीकांना पाणीपुरवठा करणार असल्याचे तहसीलदार गोरड यांनी सांगितले़
कामात हयगय करू नका
तालुक्यात निर्माण होणाºया पाणीटंचाईच्या निवारणार्थ अधिकारी व कर्मचाºयांनी सर्तक राहणे आवश्यक असून, जो कोणी या कामात हयगय करेल त्याच्या विरूद्ध कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तहसीलदार संतोष गोरड यांनी सांगितले़

Web Title: 150 agricultural power supply breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.