जालना जिल्ह्यात १५ लाख किमतीचे १५ हजार लिटर बायोडिझेल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 01:34 PM2021-10-08T13:34:42+5:302021-10-08T13:35:34+5:30
Crime in Jalana : महसूल विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई
भोकरदन (जि. जालना) : भोकरदन- सिल्लोड रोडवरील इब्राहिमपूर शिवारात महसूल विभाग व पोलिसांनी गुरुवारी सकाळी धाड टाकत बेकायदेशिर विक्री होत असलेले १५ हजार लिटर बायोडिझेल ( biodiesel seized ) जप्त केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत (crime in Jalana ) सुरू होती.
भोकरदन व जाफराबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशिररीत्या बायोडिझेलची सर्रास विक्री करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांना मिळाली. याआधारे नायब तहसीलदार बालाजी पपुलवाड, पोलीस कर्मचारी समाधान जगताप यांनी इब्राहिमपूर शिवारातील मुठाड पाटीजवळील एका ढाब्याच्या पाठीमागे छापा मारला. यावेळी १५ लाख रुपये किमतीचे १५ हजार लिटर बायोडिझेल जप्त करण्यात आले.
आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, १५ हजार लिटर बायोडिझेल जप्त करण्यात आले. याप्रकरणी दुपारी ४ वाजेपर्यंत भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. महसूल विभागाने तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सपोनि रत्नदीप जोगदंड यांनी सांगितले. ही कारवाई नायब तहसीलदार संदीप लाड, तलाठी कल्याण माने, तलाठी गणेश वाघमारे, चालक समाधान जगताप, पोलीस कॉन्स्टेबल विकास जाधव, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी तेलंगरे, कर्मचारी बालाजी पप्पूलवाड यांनी केली आहे.