निम्न दुधनात १८ टक्के जीवंत पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:10 AM2018-11-03T00:10:41+5:302018-11-03T00:12:59+5:30
निम्न दुधना प्रकल्पात केवळ १६.३६ टक्के जिवंत पाणी साठा शिल्लक असून पिण्याच्या पाण्या बरोबरच सिंचनाचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : निम्न दुधना प्रकल्पात केवळ १६.३६ टक्के जिवंत पाणी साठा शिल्लक असून पिण्याच्या पाण्या बरोबरच सिंचनाचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परतूर तालूक्यात यावर्षी पन्नास टक्केही पाउस न झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली नाही. धरण तलाव, विहीरी, बोअर यांची पाणी पातळी आजच उन्हाळा प्रमाणे आहे. मागील वर्षीही पावसाने सरासरी न ओलांडयाने निम्न दुधना प्रकल्पात पाणीसाठा ८० टक्कयाहून खाली होता. यावर्षी तर पूर्ण पावसाळयात केवळ दहा ते बारा टक्के पाणीवाढ झाली होती. उपसा मोठया प्रमाणात व पाण्याची आवक न झाल्याने आता या धरणात जिवंत पाणी साठा केवळ १८.३६ टक्के आहे, तर एकूण पाणी साठा ४२ टक्के आहे. म्हणजे १४७ दलघमी. या पाणी साठयावर आता पुढील आठ नऊ महिने अवलंबून रहावे लागणार आहे. यावर्षी परभणी व सेलूची तहान भागवण्यासाठी तीन वेळा या धरणातून पाणी खाली पात्रात सोडण्यात आले. यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय झाला. यापुढे तरी या पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. या पाण्यावर परतूर सेलू, मंठासह अनेक गावाची तहान अवलंबून आहे. या बरोबरच उस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करून या पाण्याच्या भरवशावर उसाचे व ईतर बागायती क्षेत्र वाढवले आहे.