जालन्याचे युवक फडकवणार १८२ फुटांचा तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:34 AM2019-01-24T00:34:15+5:302019-01-24T00:34:42+5:30
एकतेला आणखी मजबूत करण्यासाठी १८२ फुटांचा तिरंगा घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. हा तिरंगा झेंडा जालना तालुक्यातील खरपुडी येथे तयार करण्यात आल्याची माहिती एक्सप्लोरर्स ग्रुपचे सदस्य विनोद सुरडकर आणि पंकज खरटमल यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील एक्सप्लोरर्स या नवतरूणांच्या ग्रुपने यंदाच्या प्रजा सत्ताक दिनी अनोखा आणि हटके उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच नर्मदेच्या तिरावर वडोद्रा येथे केंद्र सरकारने ३ हजार कोटी रूपये खर्च करून स्टॅच्यू आॅफ युनिटी एकतेचे प्रतीक असलेला पुतळा जो की, १८२ फुटांचा आहे. त्यामुळेच आम्ही देखील तेथे जाताना काही तरी हटके करून एकतेला आणखी मजबूत करण्यासाठी १८२ फुटांचा तिरंगा घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. हा तिरंगा झेंडा जालना तालुक्यातील खरपुडी येथे तयार करण्यात आल्याची माहिती एक्सप्लोरर्स ग्रुपचे सदस्य विनोद सुरडकर आणि पंकज खरटमल यांनी दिली.
आम्ही ग्रुपमधील जवळपास ४० पेक्षा अधिक जण स्वतंत्र गाडीकरून वडोदरा येथे सरदार वल्लभाई पटेलांच्या पुतळ्याला भेट देण्याचे ठरवले आहे. परंतु तेथे नुसते तो पुतळा पाहण्यासाठी जाण्याऐवजी तेथे जाऊन आपणही प्रजासत्ताक दिना निमित्त एकतेचा संदेश देण्यासाठी काही तरी हटके करण्याचा विचार सर्वांचा होता. त्यातूनच मग १८२ फुटांचा तिरंगा झेंडा तयार करण्याचे ठरवले. खरपुडी येथील टेलर परमेश्वर उरटवाड यांनी हा झेंडा तयार केला आहे. त्यावरील अशोक चक्रही तेथेच तयार करण्यात आल्याचे सुरडकर यांनी सांगितले. या उपक्रमांसह आगामी काळात अन्य कल्याणकारी उपक्रम राबविण्याचा आमचा मनोदय असल्याचेही सुरडकर यांनी सांगितले.