सीईटी परीक्षेसाठी १९ परीक्षा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:16 AM2018-05-06T01:16:29+5:302018-05-06T01:16:29+5:30

राज्य सरकारतर्फे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात सीईटी गुरूवारी होणार आहे. यासाठी प्रशासानाने आवश्यक ती तयारी केली आहे.

19 Examination Center for CET Examination | सीईटी परीक्षेसाठी १९ परीक्षा केंद्र

सीईटी परीक्षेसाठी १९ परीक्षा केंद्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्य सरकारतर्फे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात सीईटी गुरूवारी होणार आहे. यासाठी प्रशासानाने आवश्यक ती तयारी केली आहे.
या परीक्षेसाठी जालन्यात १९ परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था केली असून, परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा समन्वयक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी हे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४६० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
गुरूवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही परीक्षा दोन टप्प्यात होणार आहे. ही परीक्षा मस्त्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागेवाडी, मत्स्योदरी महाविद्यालय मोतीबाग, शासकीय तंत्रनिकेतन, डॉ. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, सीपी कॉलेज, रेयान इंटरनॅशनल स्कूल, एम.एस.जैन मराठी विद्यालय, जिल्हा परिषद मुलींची शाळा, जेईएस महाविद्यालय, सेंटमेंरी स्कूल, सरस्वती भुवन, जिल्हा परिषद मुलांची शाळा, विद्यांचल शिक्षण संस्था, सीटीएमके हायस्कूल, एम.एस.जैन इंग्लीश स्कूल यांचा त्यात समावेश आहे.
या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात म्हणून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी नियोजित वेळेच्या पंधरा ते वीस मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिल्या आहेत.

Web Title: 19 Examination Center for CET Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.