६ परिचरपदासाठी १२९५ जणांनी दिली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 01:16 AM2020-01-14T01:16:29+5:302020-01-14T01:17:39+5:30

आरोग्य सेवक १५२, कनिष्ठ सहायक १३७ तर परिचरपदासाठी १२९५ जणांनी परीक्षा दिली.

199 candidates appeared for 5 attendant posts | ६ परिचरपदासाठी १२९५ जणांनी दिली परीक्षा

६ परिचरपदासाठी १२९५ जणांनी दिली परीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अनूसूचित जमातीच्या प्रवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरण्याचे आदेश शासनाने दिले होते. यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य सेवक, कनिष्ठ सहायक, परिचर या पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. आरोग्य सेवक २९०, कनिष्ठ सहायक २७१ तर परिचरपदासाठी तब्बल २००२ अर्ज आले होते. या पदासाठी सोमवारी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस आरोग्य सेवक १५२, कनिष्ठ सहायक १३७ तर परिचरपदासाठी १२९५ जणांनी परीक्षा दिली.
जालना जिल्हा परिषदेअंतर्गत गट- क व गट- ड मधील सरळसेवेतील अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याचे आदेश शासनाने जिल्हा परिषद प्रशासनास दिले होते. आरोग्य सेवक (पुरूष) १, कनिष्ठ सहायक १, परिचर सहा अशी पदे मंजूर होती. यासाठी २८ डिसेंबर ते ६ जानेवारी या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात आले.
आरोग्यसेवक पदासाठी २९०, कनिष्ठ सहायक पदासाठी २७१ तर परिचर पदासाठी २००२ अर्ज प्राप्त झाले होते. या सर्व अर्जांची छाननी करून आरोग्य सेवकपदासाठी आलेल्या २९० पैकी २५६ पात्र तर ३४ अर्ज अपात्र ठरविण्यात आले. कनिष्ठ सहायक पदासाठी आलेल्या २७१ पैकी २१७ अर्ज पात्र तर ५४ अर्ज अपात्र ठरविण्यात आले. परिचर पदासाठी आलेल्या २००२ अर्जांपैकी १६०३ अर्ज पात्र ठरविण्यात आले तर ३८९ अर्ज अपात्र ठरविण्यात आले. यासाठी १३ जानेवारी रोजी परीक्षा ठेवण्यात आली होती. यात आरोग्य सेवकपदासाठी १५२, कनिष्ठ सहाय्यक १३७, परिचर पदासाठी १२९५ जणांनी परीक्षा दिली.
आरोग्यसेवक, कनिष्ठ सहायक व परिचर पदासाठी सोमवारी परीक्षा घेण्यात आली. आरोग्य सेवकपदासाठी १५२ जणांची उपस्थिती होती तर १०४ जणांनी परीक्षेस दांडी मारली. कनिष्ठ सहायकपदासाठी १३७ जणांनी परीक्षा दिली तर ८० जणांनी परीक्षेस दांडी मारली. परिचरपदासाठी १२९५ जणांनी परीक्षा दिली तर ३५९ जण गैरहजर राहिले.

Web Title: 199 candidates appeared for 5 attendant posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.