३२ जणांना २० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:53 AM2019-09-11T00:53:31+5:302019-09-11T00:54:33+5:30

३२ जणांकडे ई-वेबिल आढळून आले नसल्याने त्यांना २० लाख रूपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती जीएसटी विभागाचे सहायक कर आयुक्त रवींद्र जोगदंड यांनी दिली.

20 lacs penalty to 32 persons by GST office | ३२ जणांना २० लाखांचा दंड

३२ जणांना २० लाखांचा दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ई-वेबिलच्या मुद्यावरून जीएसटीच्या राज्य कर विभागाकडून सोमवारी जालन्यातील जवळपास ५६६ ट्रक चालकांची अचानक तपासणी करण्यात आली. यावेळी बहुतांश जणांकडे ई-वेबिल आढळून आले. या कारवाईत ३२ जणांकडे ई-वेबिल आढळून आले नसल्याने त्यांना २० लाख रूपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती जीएसटी विभागाचे सहायक कर आयुक्त रवींद्र जोगदंड यांनी दिली.
गेल्या वर्षीपासून केंद्र सरकारने ई-वेबिलचा कायदा केला. त्यात ज्या कंपनीतून माल निघाला त्या साहित्याची सविस्तर माहिती त्यात त्याची किंमत, वजन आदींचा समावेश असतो.
तसेच तो माल कुठल्या पत्त्यावर जाणार आहे. याची माहिती त्या बिलामध्ये नमूद असते. हे ई-वेबिल घेतल्याशिवाय कुठल्याचा मालाची वाहतूक करणे आता गुन्हा ठरविण्यात आला आहे. परंतु असे असतानाही अनेकजण या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले.
यामुळे सोमवारी भल्या पहाटेपासून जीएसटी विभागाचे ४० जणांचे पथक जालना ते औरंगाबाद मार्गावर तळ ठाकून होते.
सोमवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत त्यांनी ट्रक चालकांची तपासणी केली.
त्यात ३२ जणांकडे बिल नसल्याने त्यांना दंड करण्यात आल्याचे जोगदंड यांनी नमूद केले.

Web Title: 20 lacs penalty to 32 persons by GST office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.