बंद पडलेल्या हातपंपांचे भाग्य कधी उजळणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:45 AM2019-02-12T00:45:37+5:302019-02-12T00:46:13+5:30
शहरात जवळपास २०० हातपंप बसविण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी अनेक हातपंप बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळावी, यासाठी शहरात जवळपास २०० हातपंप बसविण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी अनेक हातपंप बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. स्वच्छता अभियानातून या हातपंपांचे भाग्य उजळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरात बऱ्याच ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांची वस्ती आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने ते नगरपालिकेचा नळ घेऊ शकत नाही. अशा नागरिकांसाठी प्रशासनाकडून हातपंपांची सुविधा करण्यात आलेली आहे. तर ज्या भागात अद्याप नगरपालिकेचे नळ कनेक्शन पोहोचलेले नाही. अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात हातपंपांची सुविधा केलेली असते. हातपंप कोणत्या भागात लावायचा? त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात भूगर्भात पाण्याची सुविधा आहे का याची चाचपणी करुनच हातपंप बसविण्याचा
निर्णय घेण्यात येतो. नगरपालिकेने शहरातील विविध भागांमध्ये जवळपास २०० ठिकाणी हातपंप बसविले आहे. परंतु, शहरातील हातपंप पाण्याअभावी कोरडे, तर कुठे वापराविना खराब झाल्याने भंगार पडले आहेत.
तर बोटावर मोजण्या इतके हातपंप सुरु आहेत.
शहरातील रस्ते काम होताना हातपंप जमिनीत पूर्णपणे खाली गेले आहेत. तर काहीचे साहित्य चोरीला देखील गेले आहेत. मात्र. नगरपालिका प्रशासन यावर कोणतेही पाऊल उचलत नाही. हातपंपातून पाणी उपलब्ध झाल्यास टंचाईवर मात करता येऊ शकते.