मनोज जरांगे यांना २४ तास शासकीय सुरक्षा; दोन शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती

By विजय मुंडे  | Published: February 2, 2024 07:40 PM2024-02-02T19:40:11+5:302024-02-02T19:41:14+5:30

पोलिस सुरक्षा पुरविण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती.

24 hours government security for Manoj Jarange; Appointment of two armed policemen | मनोज जरांगे यांना २४ तास शासकीय सुरक्षा; दोन शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती

मनोज जरांगे यांना २४ तास शासकीय सुरक्षा; दोन शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी दोन शस्त्रधारी पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानुसार जरांगे पाटील यांना २४ तास सेवा देण्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून जिल्हा पोलिस दलाच्या वतीने केली जात आहे.

मराठा आरक्षण आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत. त्यांना पोलिस सुरक्षा पुरविण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारपासून दोन शस्त्रधारी पोलिस कर्मचारी जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आल्याची माहिती गोंदी पोलिस ठाण्याचे सपोनि. आशिष खांडेकर यांनी दिली.

सरकारची सुपारी घेवून बोलू नका
सरकारची सुपारी घेऊन बोलणं तुमच्या सारख्यांना शोभत नाही. आमच्या पोरांना आरक्षण म्हणजे काय आणि आमच्या विरोधात कोण बोलतं हे सगळं कळतं. आमच्यात फूट पाडण्याचे तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांना लगावला. राज ठाकरे यांना मानणारे समाजात अनेक आहेत. त्यांच्यात गैरसमज पसरवू नयेत, असेही ते म्हणाले.

Web Title: 24 hours government security for Manoj Jarange; Appointment of two armed policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.