२५ शेळ्यांचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:55 AM2019-05-07T00:55:04+5:302019-05-07T00:55:27+5:30
पारडगाव येथील शेतकरी दामोदर बाळाराम वढे यांची गट क्रमांक २५४ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतातील गोठ्यात नेहमी प्रमाणे त्यांच्या मालकीच्या २५ शेळ्या बांधल्या होत्या. सोमवारी वढे हे शेतात गेले असता, त्यांना त्या अज्ञात पशूने मारल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील शेतकरी दामोदर बाळाराम वढे यांची गट क्रमांक २५४ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतातील गोठ्यात नेहमी प्रमाणे त्यांच्या मालकीच्या २५ शेळ्या बांधल्या होत्या. सोमवारी वढे हे शेतात गेले असता, त्यांना त्या अज्ञात पशूने मारल्याचे दिसून आले. यामुळे ते पूर्णत: हादरून गेले. त्यांनी लगेचच ही माहिती सरपंच तसेच वनविभागातील अधिकाऱ्यांना दिली.
दरम्यान या शेळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप अस्पष्ट आहे. या शेळ्यांवर लांडग्याने अथवा बिबट्याने हल्ला केला का, या बद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. वढे यांना दुष्काळामुळे यंदा शेतीत जेमतेमच उत्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे दोन बैल दीड लाख रूपयांना विक्री करून २५ शेळ्या खरेदी केल्या होत्या. या शेळ्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी वढे यांनी केली आहे.