मांदळा तलावावर सापडल्या २५ मोटारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:51 PM2020-02-29T23:51:02+5:302020-02-29T23:51:49+5:30

मांदळा तलावातून अवैधरीत्या पाणीउपसा करणाऱ्यांविरुद्ध महसूल पथकाने कारवाई सुरू केली आहे

25 motors found on Mandala Lake | मांदळा तलावावर सापडल्या २५ मोटारी

मांदळा तलावावर सापडल्या २५ मोटारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी : तालुक्यातील मांदळा तलावातून अवैधरीत्या पाणीउपसा करणाऱ्यांविरुद्ध महसूल पथकाने कारवाई सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात शनिवारी केलेल्या पाहणीत जवळपास २५ शेतकऱ्यांच्या मोटारी तलावावर दिसून आल्या. संबंधित शेतक-यांना समज देऊन पाणीउपसा बंद करण्यात आला. यापुढील काळात अवैध पाणीउपसा केला तर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा पथकातील अधिका-यांनी दिला.
घनसावंगी तालुक्यातील मांदळा तलावातून पाण्याचा अवैध उपसा सुरू होता. याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पाहणीबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नगर पालिका, महसूल व महावितरणच्या अधिकारी, कर्मचा-यांच्या पथकाने पाहणी केली. पाहणीवेळी या तलावावर अवैध पाणी उपसा करणाºया २५ मोटारी दिसून आल्या. याचा पंचनामा करून संबंधितांनी मोटारी, पंप काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. यापुढील काळात अवैध पाणीउपसा केला तर नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी घनसावंगी तहसीलचे अक्षय देशमुख, नगर पंचायतीचे कर्मचारी ज्ञानेश्वर सोमवारे, राजू भारस्कर, सखाराम नाईक, शेख महेबूब, राजेभाऊ वजीर, दादू हिवाळे, विष्णू कदम, भागवत धाईत, सय्यद अन्वर, कांता सोमवारे, पटेकर, सय्यद हमजा, महावितरणचे उपअभियंता नागरे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, या पाहणीनंतर हे पथक अवैध पाणी उपशाविरुद्ध कारवाई करेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: 25 motors found on Mandala Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.