२५ गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:57 AM2018-03-14T00:57:16+5:302018-03-14T00:57:56+5:30
भोकरदन तालुक्यातील हसनाबाद सबस्टेशनचा विद्युत पुरवठा सोमवारी सायंकाळपासून खंडित झाल्याने परिसरातील २५ गावे अंधारात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील हसनाबाद सबस्टेशनचा विद्युत पुरवठा सोमवारी सायंकाळपासून खंडित झाल्याने परिसरातील २५ गावे अंधारात आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
विजेअभावी हसनाबाद व परिसरातील परिसरातील सरकारी, खाजगी बँकेतील सर्व व्यवहार ठप्प झाले. सध्या माध्यमिक व शालांत परीक्षा सुरु असून विजेअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या उकाडा चांगलाच जाणवत असून, त्यातच वीज नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
वीज नसल्याने पाणीपुरवठ्यासह गावातील पिठाची गिरणी बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली.
याप्रकरणी वीज वितरण कंपनीच्या कर्मचा-यांशी ग्रामस्थांची संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेत वीज वितरण कंपनीने तात्काळ दुरुस्ती करुन वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.