धरणे आंदोलनात २५१ जणांचे मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:49 AM2018-08-06T00:49:59+5:302018-08-06T00:50:21+5:30

खेड्यातून माणसे आता कामधंद्यासाठी शहराकडे जात असल्याने खेडी ओस पडत आहेत. असे विदारक चित्र असल्याने शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवत आहे. या गंभीर बाबींकडे आता मराठा समाजातील नेत्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचे प्रतिपादन नाटकार प्रा. राजकुमार तांगडे यांनी केले.

251 people's shocking headlines | धरणे आंदोलनात २५१ जणांचे मुंडण

धरणे आंदोलनात २५१ जणांचे मुंडण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठा समाज शेतीवरच अवलंबून आहे, शेतीमालास भाव नाही, शेतीची झालेली दयनीय अवस्था, यामुळे बँकाकडे शेतजमिनी गहाण पडलेल्या आहेत.
खेड्यातून माणसे आता कामधंद्यासाठी शहराकडे जात असल्याने खेडी ओस पडत आहेत. असे विदारक चित्र असल्याने शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवत आहे. या गंभीर बाबींकडे आता मराठा समाजातील नेत्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचे प्रतिपादन नाटकार प्रा. राजकुमार तांगडे यांनी केले. त्यांनी रविवारी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनास भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे विदारक चित्र मांडले.
रविवारी सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले. यात समाज बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला. रविवारी २५१ जणांनी आरक्षणाची घोषणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासनाचा निषेध नोंदविला. आरक्षण आमच्या हक्काच...नाही कुणाच बापाच...एक मराठा..लाख मराठा..अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आगामी दोन दिवस (ता.८) पर्यंत मुंडण आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यानंतर सर्व गोळा केलेली केस हे जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहेत.
नाटककार राजकुमार तांगडे, सिने कलावंत, दिग्दर्शक संभाजी तांगडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संवाद साधला. राज्यकर्त्यांकडुन होत असलेली दिशाभूल, तकलादू घोषणांची न होणारी अंमलबजावणी जाती-जातीत संघर्ष पेटविण्यासाठी केलेला बुध्दीभेद या सगळ्यांची चिरफाड करत राजकुमार तांगडे यांनी शासनाचा खरपूस समाचार घेतला. महाबंपर नौकर भरतीस अडवू नका असे म्हणणाºयांनी चार वर्षात ज्या तरूणांचे वय निघून गेले, त्यांच्या भवितव्याचा विचार का केला नाही, असा प्रश्न उपस्थित करून रक्ताचे पाणी करत उभारलेला लढा सुरू ठेवावा या लढ्याच्या यशानंतर शेतमालासाठी असाच लढा उभारण्याचे आवाहन तांगडे यांनी केले. संभाजी तांगडे यांनी पोवाड्यातून छत्रपती शिवरायांनी अठरा-पगड जातींना सोबत घेऊन सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्ष साकारली याचे वर्णन केले. यावेळी समाज बांधवांसह तरूण, महिला व विद्यार्थीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना : गोळेगाव येथील नदीपात्रात तरूणांचे आंदोलन
आष्टी : परतूर तालुक्यातील गोळेगाव येथील तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी रविवारी सकाळी गोदवरी नदीपात्रात जाऊन आंदोलन केले. यावेळी सरकारची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात सकल मराठा समाजातील युवकांची मोठी उपस्थिती होती. तहसीलदार डी. डी. फुफाटे यांनी हे मागण्यांचे निवेदन तातडीने वरिष्ठांना पाठविण्यात येईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी चोख बंदोस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title: 251 people's shocking headlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.