२८ जुगारी पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:35 AM2019-03-10T00:35:27+5:302019-03-10T00:35:45+5:30
एडीएस आणि गोंदी पोलिसांनी अंबड तालुक्यातील लखमापुरी आणि बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा मारुन तब्बल २८ जुगाऱ्यांना अटक केली.
जालना/शहागड : एडीएस आणि गोंदी पोलिसांनी अंबड तालुक्यातील लखमापुरी आणि बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा मारुन तब्बल २८ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अंबड तालुक्यातील लखमापुरी येथे झन्ना- मन्ना जुगार सुरु असल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर यांच्या पथकाने दुपारी जुगार अड्ड्यावर छापा मारुन अठरा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.
अंकुश झाकणे, आकाश राम जाधव, उदय वाघमारे, काशीनाथ शिंदे, परमेश्वर रेंगे, कृष्णा डाखोरकर, दिनेश लांडगे, प्रकाश भापकर, बबन पाटील, योगेश जाधव, रामेश्वर खवले, शेषराव शेळके, बंडू चव्हाण, सय्यद मुक्तार अझीम, अविनाश पवार, दत्ता मोगुटकर, विश्वनाथ पटेकर, शेषराव उघडे, यांच्याविरुध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.