जालन्यात २८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ६४८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 03:09 PM2020-07-03T15:09:26+5:302020-07-03T15:10:06+5:30

जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून गुरूवारी १५४ स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते.

28 positive reports in Jalna; Total number of patients is 648 | जालन्यात २८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ६४८

जालन्यात २८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ६४८

Next

जालना : जिल्ह्यातील २८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार समोर आले आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ६४८ वर गेली आहे.

जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून गुरूवारी १५४ स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार २८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. बाधित रूग्णांमध्ये जालना शहरातील मूर्तीवेस भागातील पाच, एसटी कॉलनीतील एक, गोपालपुरा येथील एक, चंदनझिरा येथील एक, १६ चौकी नया बाजार येथील एक, अग्रसेननगर मधील दोन, कादराबादमधील चार, सुवर्णकारनगर मधील एक, मसानपूर जालना येथील एक, वालसावडाळा येथील एक, धावडा येथील एक, भोकरदन शहरातील सहा, अंबड शहरातील दोन, जाफराबाद शहरातील एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. 

दरम्यान, आजवर एकूण ६४८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून, त्यातील १९ जणांचा बळी गेला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ३६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Web Title: 28 positive reports in Jalna; Total number of patients is 648

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.