प्रभाग रचनेवर २५ गावांतून ५१ आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:38 AM2020-02-21T00:38:44+5:302020-02-21T00:39:04+5:30

जुलै ते डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने प्रक्रिया हाती घेतली आहे.

3 objections from 5 villages on the composition of the ward | प्रभाग रचनेवर २५ गावांतून ५१ आक्षेप

प्रभाग रचनेवर २५ गावांतून ५१ आक्षेप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जुलै ते डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने प्रक्रिया हाती घेतली आहे. आरक्षण सोडत, प्रारूप प्रभाग रचनेवर तालुक्यातील २५ गावातून ५१ जणांनी आक्षेप घेतले असून, त्यावर २७ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी होणार आहे.
जालना तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतीची जुलै ते डिसेंबर अखेरपर्यंत मुदत संपणार आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी तालुका निवडणूक विभागाने डिसेंबर २०१९ पासून विविध प्रक्रिया राबविण्यास सुरूवात केली आहे.
गावचे नकाशे अंतिम करणे, प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे, आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया करणे, प्राथमिक तपासणी व नंतर दुरूस्त्या करणे, विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत, प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यानंतर तहसीलदारांनी हरकती मागविल्या होत्या. आजवर तालुक्यातील देवमूर्ती येथून सर्वाधिक ८, गोलापांगरी येथून ५, दरेगाव, धानोरा, डांबरी, हिस्वन (बु.), निधोना- अंबेडकरवाडी, सोमनाथ (ज) येथून प्रत्येकी तीन आक्षेप दाखल झाले आहेत.
पारेगाव- जैतापूर, भिलपुरी, सेवली येथून प्रत्येकी दोन आक्षेप दाखल झाले आहेत. तर घेटुळी, हिवर्डी, पाचन वडगाव, वानडगाव, मौजपुरी, जामवाडी, बेथलम, लोंढेवाडी, विरेगाव, निरखेडा, हस्तपिंपळगाव, तांदुळवाडी (बु.), उटवद, धांडेगाव येथून प्रत्येकी एक आक्षेप दाखल करण्यात आला आहे. या आक्षेपांवर २७ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी होणार आहे.

Web Title: 3 objections from 5 villages on the composition of the ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.