महावितरणला ३० हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:49 AM2018-06-24T00:49:52+5:302018-06-24T00:50:13+5:30

विना परवाना वीज वापर केल्यास वीज वितरणकडून दंड आकारल्याच्या असंख्य घटना आहेत. परंतु कोटेशन भरूनही वीज जोडणी न केल्याने वीज वितरणला जिल्हा ग्राहक मंचाने ३० हजारांचा दंड ठोठावला आहे.

30 thousand penalties to Mahavitaran | महावितरणला ३० हजाराचा दंड

महावितरणला ३० हजाराचा दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : विना परवाना वीज वापर केल्यास वीज वितरणकडून दंड आकारल्याच्या असंख्य घटना आहेत. परंतु कोटेशन भरूनही वीज जोडणी न केल्याने वीज वितरणला जिल्हा ग्राहक मंचाने ३० हजारांचा दंड ठोठावला आहे.
श्रीपत धामणगाव येथील शेतकरी सरोजबाई रामेश्वर शिंदे (५५) यांनी आपल्या शेतात विहीर खोदली. मात्र, बागायती करण्यासाठी व कृषीपंपाने पाणी उपसण्यासाठी वीज नसल्याने जानेवारी २०१२ मध्ये वीज जोडणीसाठी त्यांनी कोटेशन भरले. मात्र महावितरणच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्याला गेल्या सहा वर्षापासून वीज जोडणी मिळाली नसल्याने शेतक-याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे फेब्रुवारी २०१८ मध्ये तक्रार दाखल केली. त्यानूसार साक्ष, पुरावे सादर झाल्यानंतर ग्राहक तक्रार निवारण मंचाने शेतकºयाच्या बाजूने निकाल दिला असून वीज वितरण कंपनीला तीस हजारांचा दंड ठोकत तीस दिवसांच्या आत वीज जोडणी देण्याचे सांगितले आहे.
दरम्यान, काही महिन्यापूर्वी वीजबिल थकबाकीदार असलेल्या कृषीपंपाचा विद्युत पुरवठा शेतक-यांना कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित करण्यात आला. त्यानंतर अनेक दिवसांनी पाठपुरावा आणि तडजोडीअंती महावितरणकडून खंङित पुरवठा सुरळीत करण्यात आला.

Web Title: 30 thousand penalties to Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.