खांब पडल्याने ३० गावांचा वीजपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:56 AM2019-04-18T00:56:13+5:302019-04-18T00:56:44+5:30
जाफराबाद तालुक्यात दोन दिवसात झालेल्या वादळामुळे हिवराकाबली, टेंभुर्णी उपकेंद्राअंतर्गत येत असलेल्या ३० गावातील अनेक विद्युत खांब कोसळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यात दोन दिवसात झालेल्या वादळामुळे हिवराकाबली, टेंभुर्णी उपकेंद्राअंतर्गत येत असलेल्या ३० गावातील अनेक विद्युत खांब कोसळले. यामुळे गावातील वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे.
तालुक्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वादळाने थैमान घातले आहे. सोमवारी, मंगळवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे गावातील आणि शेतवस्तीमधील विद्युत खांब खाली कोसळले आहेत.
यामुळे शेतकऱ्यांना नांगरणी करण्यास अडचणी येत आहेत. विजेच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह असल्याने अपघात होण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली.
वीजपुरवठा विकस्ळीत झाल्याने ग्रा.पं. पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वादळी वा-याचा फटका बसला असून या मुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.जाफराबाद ग्रामीण या सोबत माहोरा, टेंभुर्णी येथील ३३ केव्ही उपकेंद्रा अंतर्गत विविध भागांत जवळपास वीस पेक्षा अधिक विद्युत खांब खाली पडून नुकसान झाले आहे.उन्हाची तीव्रता जास्त असल्याने उकाडा वाढला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे अधिका-यांनी सांगितले.