३१ संशयित आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:58 PM2018-12-28T23:58:09+5:302018-12-28T23:58:28+5:30

विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्या आदेशानुसार गुरुवारी जालना, बीड, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या वतीने संयुक्त कॉम्बिंग आॅपरेशन राबविले. गुरुवारी सांयकाळी सुरु झालेल्या या आॅपरेशनमध्ये काळविटाची चार शिंगे, १ एलसीडी व ३१ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

31 suspected accused in custody | ३१ संशयित आरोपी ताब्यात

३१ संशयित आरोपी ताब्यात

Next
ठळक मुद्देकॉम्बिंग आॅपरेशन : प्रत्येक महिन्याला होणार कारवाई, दुसऱ्या दिवशीही धाडसत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्या आदेशानुसार गुरुवारी जालना, बीड, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या वतीने संयुक्त कॉम्बिंग आॅपरेशन राबविले. गुरुवारी सांयकाळी सुरु झालेल्या या आॅपरेशनमध्ये काळविटाची चार शिंगे, १ एलसीडी व ३१ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, दर महिन्याला हे कॉम्बिंग आॅपरेशन राबविल्या जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिली.
अंबड, गेवराई, पाचोड या परिसरात मागील काही दिवसांपासून चोरी, घरफोड्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या परिसरात मागील तीन महिन्यांपासून चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. या चोरींच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून कॉम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येत आहे.
परंतु, तरीही येथे घरफोडींच्या घटना होत आहे. यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्या आदेशानूसार गुरुवारी पुन्हा जालना, बीड व औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी कॉम्बिंग आॅपरेशन राबविले.
या कॉम्बिंग आॅपरेशन दरम्यान, जालना, बीड, औरंगाबाद जिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींच्या २६ वस्त्या तपासण्यात आल्या. यात हिस्ट्रीशिटर, फरारी, रेकॉर्डवरील घरफोडी करणारे, एबीडब्ल्यू वॉरन्ट, बीडब्ल्यू वॉरन्ट असेलेल्या ३१ जणांना ताब्यात घेवून त्यांची तपासणी करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी चंपालाल शेवगण, भोसले, स्थागुशाचे पोनि. राजेंद्रसिंह गौर, पो नि. अनिरुध्द नांदेडकर, बिड जिल्ह्यातील अधिकारी यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी केली.

Web Title: 31 suspected accused in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.