३५० मजुरांच्या हाताला मिळाले कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:10 AM2019-03-16T00:10:04+5:302019-03-16T00:11:43+5:30
मनरेगा योजनेच्या माध्यमातून घनसावंगी तालुक्यातील कंडारी ग्रामपंचयातअंतर्गत ३५० मजुरांच्या हाताळा दुष्काळातही कामे मिळाली आहेत. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
पारडगाव : मनरेगा योजनेच्या माध्यमातून घनसावंगी तालुक्यातील कंडारी ग्रामपंचयातअंतर्गत ३५० मजुरांच्या हाताळा दुष्काळातही कामे मिळाली आहेत. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
घनसावंगी तालुक्यात सध्या दुष्काळाची भिषणता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच यंदा पाऊस कमी असल्याचे परिसरातील खरीप व रबीचे पिके वाया गेली आहेत.
यामुळे मजुरांच्या हाताला कामे उरली नसल्याने त्यांच्यावर भटकंतीची वेळ आली होती. परंतु, कंडारी ग्रामपंचायतर्फे शासनस्तरावर पाठपुरावा करून गाव परिसरात मनरेगा योजनेची विविध कामे सुरू केली आहेत. यामुळे ग्रामस्थांची कामांसाठी होणारी भटकंती थांबली आहे.
या संदर्भात ग्रामरोजगार सेवक संतोष काकडे म्हणाले, रोहियाच्या कामांवर दिवसेंदिवस मजुरांची संख्या वाढत चालली आहे. सध्या स्थितीत ३५० मजुर कामे करित आहेत. यामुळे दुष्काळातही मजुरांच्या हाताला कामे मिळाली आहेत.
शिंदे वडगाव, पानेवाडी, राणीउंचेगाव, कंडारी, हातडी, वडी रामसगाव या गावात मनरेगाच्या माध्यमातून विविध कामे सुरू आहेत. तसेच आणखी काही कामे नव्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुरू असलेल्या या कामांची नुकतीच पाहणी तांत्रिक सहाय्यक दत्तात्रय सोट, ग्राम रोजगार सेवक संतोष काकडे, बजरंग काकडे, दुधकर, जगन्नाथ काकडे, राजाराम काकडे, परमेश्वर काकडे यांनी केली आहे.