५८ हजार शेतकऱ्यांना ३६० कोटींचे पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:03 AM2018-07-11T01:03:46+5:302018-07-11T01:03:59+5:30

जिल्ह्यात पीककर्ज वाटपाच्या कामाला आता गती आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महिन्याभरापूर्वी शंभर कोटीच्या आसपास असलेला पीककर्ज वाटपाचा आकडा आता साडेतीनशे कोटीच्यावर पोहचला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सहकारी तसेच महसूल आणि बँक यांना एकत्रित करून तालुका पातळीवर जे मेळावे दर आठवड्याला आयोजित केले आहेत, त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.

360 thousand crop loans for 58 thousand farmers | ५८ हजार शेतकऱ्यांना ३६० कोटींचे पीककर्ज

५८ हजार शेतकऱ्यांना ३६० कोटींचे पीककर्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात पीककर्ज वाटपाच्या कामाला आता गती आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महिन्याभरापूर्वी शंभर कोटीच्या आसपास असलेला पीककर्ज वाटपाचा आकडा आता साडेतीनशे कोटीच्यावर पोहचला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सहकारी तसेच महसूल आणि बँक यांना एकत्रित करून तालुका पातळीवर जे मेळावे दर आठवड्याला आयोजित केले आहेत, त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.
राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे जवळपास ९६ हजार शेतक-यांना नव्याने कर्ज मिळणार आहे. असे असतानाच पीककर्ज वाटपसाठी काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यासाठी महसूल, बँक आणि सहकार विभागाने एकत्रित येऊन जे प्रयत्न केले त्याला आता कुठे यश येत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात १० जुलैपर्यंत पीककर्जाचा आढावा घेतला असता, जवळपास ५८ हजार शेतक-यांना ३६० कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. पीककर्जाचा वेळावेळी आढावा जिल्हाधिकाही घेत आहेत.
जालना : बँकेतील अधिकारी, कर्मचा-यांची कसरत...
एकीकडे खरीप हंगामात पीककर्ज मिळावे म्हणून शेतक-यांच्या बँकेत रांगा लागत असून, याच दरम्यान पीकविमा भरण्यासाठीची लगबग सुरू आहे. पीकविमा भरण्याची तारीख ही २४ जुलै अंतिम असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पीकविमा भरण्यासाठी देखील शेतकरी बँकेत गर्दी करत आहे. या दोन्ही महत्वाच्या बाबींसाठी शेतक-यांची गर्दी होत असली तरी, बँकांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्यांनी नगर, नाशिक येथून अधिकारी, कर्मचा-यांना पाचारण केले असल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक इलमकर यांनी दिली.

Web Title: 360 thousand crop loans for 58 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.