४ लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:48 AM2018-10-20T00:48:54+5:302018-10-20T00:49:31+5:30
श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याने यावर्षी चार लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले. आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते गुरुवारी सपत्नीक बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याने यावर्षी चार लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले. आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते गुरुवारी सपत्नीक बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना खासदार दानवे म्हणाले की, शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा चांगला फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनाचा वापर करुन पाण्याची बचत करावी. कारखान वाचवायचा असल्यास व उसाला चांगला दर पाहिजे असेल तर कारखान्यास परिपक्व उसाचा पुरवठा करावा. त्यामुळे शासनाच्या हमी भावापेक्षाही जास्तीचा दर देता येईल, असे प्रतिपादन आमदार संतोष दानवे यांनी केले.
याप्रसंगी भास्कर दानवे, संचालक मंडळाचे गणेश फुके, शिवाजी थोटे, प्रकाश गिरणारे, नामदेव लोखंडे, आबाराव गायकवाड, संजय लोखंडे, सुखदेव गायकवाड, गोविंद पंडित, शोभा मतकर, शिवराम कड, भाऊसाहेब जाधव, डी.बी. शेवाळे, ज्ञानेश्वर ठोंबरे, सी. के. आंधळे, डी.डी. मोठे, रविंद्र रोटे, दिलीप लांबे, एम. ए. देशमुख, विठ्ठल म्हस्के, ज्ञानेश्वर कढवणे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होती.
गेल्या काही वर्षापासून दुष्काळी परिस्थितीमुळे साखर कारखानदारीबरोबर शेतकरीही अर्थिक अडचणीत आलेला आहे. शेतकºयांच्या हितासाठी इतर पिकांच्या तुलनेत ऊसाची लागवड करुन क्षेत्र वाढविण्यासह उत्पादक शेतकºयांना ऊस पिकाविषयी अधिक माहिती व्हावी म्हणून कारख्याच्यावतीने ऊस बेण्याची निवड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन विजय परीहार यांनी सांगितले.