४ क्विंटल अद्रक लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:34 AM2019-01-10T00:34:07+5:302019-01-10T00:34:18+5:30
सुरेश एकनाथ ठाले यांच्या शेतातील अद्रकाचे पीक उकरुन तब्बल २० हजार रुपये किमतीचे चार क्विंटल अद्रक चोरुन नेल्याची घटना बुधवारी उघडकीस आली
लोकमत न्यूज नेटवर्क
आव्हाना : येथील शेतकरी सुरेश एकनाथ ठाले यांच्या शेतातील अद्रकाचे पीक उकरुन तब्बल २० हजार रुपये किमतीचे चार क्विंटल अद्रक चोरुन नेल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
आव्हाना येथील गट क्रमांक ८१५ मध्ये शेतकरी सुरेश एकनाथ ठाले यांनी टँकरच्या पाण्यावर अद्रकाचे पीक जोपासले. अद्रकाचे पीक काढणीवर आले होते. काही दिवसात पीक काढण्यात येणार होते. असे शेतकरी ठाले म्हणाले. त्या अगोदरच चोरट्यांनी अद्रकाचे पीक खोदून तब्बल चार क्विंटल अद्रक चोरुन नेली. परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी अद्रकाचे पीक घेतात, मात्र अशा प्रकारे अद्रक चोरी गेल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पिकाचे सरंक्षणार्थ रात्र जागून काढावी लागत आहे. शेतकरी सुरेश ठाले यांच्या तक्रारीवरुन भोकरदन पोलीस ठाण्यात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.