चोरीला गेलेली ४० पोते तूर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:58 AM2018-12-30T00:58:54+5:302018-12-30T00:59:12+5:30

नवीन मोंढा भागातून ४० पोते तूर चोरुन नेणाऱ्या आरोपीला चंदनझिरा पोलिसांना अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले

40 bags pigeon peas seized | चोरीला गेलेली ४० पोते तूर जप्त

चोरीला गेलेली ४० पोते तूर जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नवीन मोंढा भागातून ४० पोते तूर चोरुन नेणाऱ्या आरोपीला चंदनझिरा पोलिसांना अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख २० हजाराची तूर जप्त करण्यात आली आहे. शेख रहीम शेख अब्दुल (ह. मु. नारेगाव, मुळ रा. उत्तर प्रदेश), असे आरोपीचे नाव आहे.
सय्यद सादीक सय्यद नुर, ( रा, बाबर कॉलनी, औरंगाबाद) यांनी २० डिसेंबर रोजी चालकाला आयशर मधून अहमदनगर येथील गुरुदत्त ट्रान्सपोर्ट येथून पावती घेऊन शेवगा-पाथर्डी येथे जावून २०० पोत तुर ट्रकमध्ये भरुन जालना येथे पोहच करण्याचे सांगितले. परंतु, चालकाने माल वेळेत पोहच केला नाही. तसेच त्याचा मोबाईलही बंद होता. त्यानंतर फिर्यादीने जालना येथील नवीन मोंढा भागात गाडीचा शोध घेतला असता, गाडी नवीन मोंढा गेट जवळ मिळाली. यातील मालाची तपासणी केली असता, त्यामध्ये ४० पोते तूर कमी असल्याचे लक्षात आले. यावरुन सय्यद सादीक सय्यद नुर यांच्या फिर्यादीवरुन चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर पोलिसांनी चालकाबाबत फिर्यादीकडे विचारपूस केली असता, त्यांनी चालकास ७ ते ८ दिवसापूर्वीच एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत कामाला ठेवले होते. या माहितीवरून त्याला कामाला लावलेल्या व्यक्तीला ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली असता, त्याने चालक हा औरंगाबाद येथील नारेगाव येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चालकास नारेगाव येथून ताब्यात घेवून त्याच्याकडून ४० पोते तूर जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: 40 bags pigeon peas seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.