तस्करीचे ४५ किलो चंदन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:31 AM2018-07-01T01:31:49+5:302018-07-01T01:32:33+5:30
भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथील हस्तगत केलेले चंदननगर जिल्ह्यातील चांदा येथे नेले जात असताना विशेष कृती दलाने सापळा लावून जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथील हस्तगत केलेले चंदननगर जिल्ह्यातील चांदा येथे नेले जात असताना विशेष कृती दलाने सापळा लावून जप्त केले.
एका कारमधून या चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना मिळाली. यावरून त्यांनी सकाळी ताडहादगाव परिसरात एका ढाब्याजवळ इंडिगो कार (क्र. एम.एच. १७ एजे ६९८०) ची झडती घेतली असता त्यात ४५ किलो चंदनाची लाकडे आढळून आली. त्याची किंमत १ लाख ३५ हजार रूपये होते. कारसह चंदन जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे पो. नि. यशवंत जाधव, मारोती शिवरकर, फुलचंद हजारे, नंदकिशोर कामे, सुभाष पवार, दीपक अंभोरे यांनी यशस्वी केली.