४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:30 AM2019-03-04T00:30:59+5:302019-03-04T00:31:32+5:30
रविवारी अवैध वाळूची वाहतूक करणारे तीन हायवा व जेसीबी मशीन जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांची १५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून केळणा, गिरजा, पुर्णा नदी पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याने नदीपात्रात मोठ - मोठे खड्डे पडले आहे. या वाळू माफियांविरुद्ध नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी कारवाईचा बडगा उचला असून, रविवारी अवैध वाळूची वाहतूक करणारे तीन हायवा व जेसीबी मशीन जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांची १५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक चंदन झमले यांना खबऱ्यामार्फेत माहिती मिळाली की, केदाखेडा येथून दोन हायवा व भोकरदन शहरातून एक हायवा अवैधरित्या वाळू घेऊन जात आहे. या महितीवरुन पोलिसांनी सापळा रचून तीन हायवांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. चंदन झमले, सपोनि. सोनुने, पोउपनि. अमन सिरसाट, पोउपनि. ज्ञानेश्वर साखळे, मधुकर काळे, भोपळा, सूर्यकांत केंद्रे, भिका राठोड, रूस्तूम जैवळ, वायकोस, जाधव, निकम, उगले यांनी केली.