मराठवाड्यात ५० हजार मजुरांच्या हाताला काम; लॉकडाउनमध्ये गावी आलेल्यांना आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 03:58 AM2020-05-18T03:58:12+5:302020-05-18T07:00:52+5:30

लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. शहरात गेलेले लोक गावाकडे परतू लागले आहेत.

50,000 laborers in Marathwada; Support to those who came to the village in the lockdown | मराठवाड्यात ५० हजार मजुरांच्या हाताला काम; लॉकडाउनमध्ये गावी आलेल्यांना आधार

मराठवाड्यात ५० हजार मजुरांच्या हाताला काम; लॉकडाउनमध्ये गावी आलेल्यांना आधार

Next

- दीपक ढोले

जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग व व्यवसाय ठप्प झाले असताना रोजगार हमी योजनेने अनेकांच्या हाताला काम दिले आहे. सर्वाधिक १२,३४१ मजुरांना जालना जिल्ह्यात रोजगार तर पाठोपाठ १०१८०
मजुरांना उस्मानाबाद जिल्ह्यात मिळाला आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. शहरात गेलेले लोक गावाकडे परतू लागले आहेत. बेरोजगार झालेल्या या नागरिकांना गावातच काम मिळावे, यासाठी शासनाने रोजगार हमी योजने अंतर्गत कामे उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने योग्य नियोजन करून जालना जिल्ह्यात ३३५ ग्रामपंचायतीमध्ये ९८४ कामे सुरू केली.
या कामावर १२३४१ मजूर उपस्थित असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांनी दिली. उस्मानाबादमध्ये ५३० ग्रामपंचायतींमध्ये १०४९ कामे सुरू असून, या कामांवर १०१८० मजूरांची उपस्थिती आहेत.

जिल्हा निहाय
मजूर उपस्थिती
जिल्हा मजूर उपस्थिती
जालना 12,341
औरंगाबाद 6,699
परभणी 6,144
उस्मानाबाद 10,180
नांदेड 7,828
हिंगोली 7,045
बीड 3,332
लातूर 6,700
एकूण 52,441

Web Title: 50,000 laborers in Marathwada; Support to those who came to the village in the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.