भरदिवसा दुचाकीच्या डिकीतून ५० हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:31 AM2021-03-05T04:31:08+5:302021-03-05T04:31:08+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा तालुक्यातील उंबरखेड येथील सुधाकर बाबुराव कंकाळ (३५) हे मंगळवारी दुपारी ५० हजार रुपये भरण्यासाठी ...

50,000 lamps from the deck of a two-wheeler all day long | भरदिवसा दुचाकीच्या डिकीतून ५० हजार लंपास

भरदिवसा दुचाकीच्या डिकीतून ५० हजार लंपास

Next

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा तालुक्यातील उंबरखेड येथील सुधाकर बाबुराव कंकाळ (३५) हे मंगळवारी दुपारी ५० हजार रुपये भरण्यासाठी बँकेत आले होते. स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या शाखेसमोर दुचाकी उभी करून ते बँकेत गेले. कॅशियरने त्यांना आधार कार्ड मागितले असता त्यांच्याकडे आधार कार्ड नव्हते. ते परत बँकेच्या बाहेर आले व डिकीत पैसे ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर दुचाकी उभी करून शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्याने डिकीतील ५० हजार रुपये लंपास केले. डिकीतून पैसे चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन सीसीटीव्ही पाहिले असता, एक व्यक्ती पैसे काढत असताना दिसून आला. पोलीस त्याच्या मागावर आहेत. या प्रकरणी सुधाकर बाबूराव कंकाळ यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बीट जमादार गजानन भराड करीत आहेत.

Web Title: 50,000 lamps from the deck of a two-wheeler all day long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.