ज्ञानमंदिरात साकारतेय ५१ फूट विठ्ठलाची मूर्ती..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:11 AM2019-06-28T00:11:34+5:302019-06-28T00:11:44+5:30
परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथे आर्ट आॅफ लिव्हिंग स्थापित ज्ञान मंदिर आश्रम परिसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची ५१ फूट मूर्ती तयार करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाटूर : परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथे आर्ट आॅफ लिव्हिंग स्थापित ज्ञान मंदिर आश्रम परिसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची ५१ फूट मूर्ती तयार करण्यात येत आहे.
आषाढी एकादशी जवळ येताच पंढरपूरच्या वारीची लगबग सुरू होते जय हरी, विठ्ठल विठ्ठल, माऊली माऊली या उद्घोषाने वारकरी मंडळी पंढरपूरकडे रवाना होतात. याच धर्तीवर वाटूर येथे आर्ट आॅफ लिव्हिंग स्थापित श्री श्री ज्ञान मंदिर आश्रम परिसरात ५१ फुटाची भव्य विठ्ठलाची मूर्ती स्थापन होत आहे. त्यामुळे वाटूरची प्रति पंढरपूर म्हणून ओळख होणार आहे. प्रभांजन महातोले, नंदकिशोर आवटी, प्रीतम गोसावी, अंकुश दादा भालेकर, अजित हजारी यांच्या संकल्पनेतून ही भव्य विठ्ठलाची मूर्ती तयार करण्यात येत आहे. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा होऊन पंचक्रोशीतील सर्व भक्तांना विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती आश्रम प्रशासनाने दिली.