‘सुपर ३०’ साठी ५३४ विद्यार्थ्यांची लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:11 AM2019-05-20T00:11:31+5:302019-05-20T00:12:10+5:30

खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीने आयआयटी सुपर थर्टी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आपले आयआयटीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

534 students will attend the 'Super 30' test | ‘सुपर ३०’ साठी ५३४ विद्यार्थ्यांची लागणार कसोटी

‘सुपर ३०’ साठी ५३४ विद्यार्थ्यांची लागणार कसोटी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रामनगर : गुणवत्ता असतानाही होतकरू विद्यार्थी हलाखीच्या परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे, यासाठी खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीने आयआयटी सुपर थर्टी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आपले आयआयटीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठीच्या प्रवेशाची १८ शनिवारी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली. ५३४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.
ग्रामीण भागातील गुणवंत हुशार विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणाकडे जात नाही. परिणामी, गुणवंत गुणवत्ता असतांनाही उच्च शिक्षणापासून ही मुले वंचित राहतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आयआयटीचे शिक्षण घेता यावे, यासाठी खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीने आयआयटी सुपर थर्टी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कृषिभूषण विजयअण्णा बोराडे, कृषिभूषण भगवानराव काळे यांच्या प्रयत्नाने हा उपक्रम सुरु करण्यात आला असून, यासाठी ज्या गरीब विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घ्याचा आहे. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी तब्बल साडेसातशे विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले.
त्यानुसार १८ मे रोजी प्रवेशपूर्व परिक्षा घेण्यात आली. ५३४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, त्याचे निकालही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांनी स्वत: विद्यार्थ्यांचे ओळखपत्र व बैठक व्यवस्थेची पाहणी केली.

३० विद्यार्थ्यांना मिळणार संधी
यातून तीस विद्यार्थींची निवड करण्यात येणार असून, त्यांची अकरावी व बारावीची सर्व तयारी मोफत केली जाणार आहे. ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना ही मोठी संधी मिळाली आहे.
ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, शिक्षक विचारवंत तसेच कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
४जालना जिल्ह्यात आयआयटीची तयारी करण्यासाठी क्लासेस नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यातच बाहेर गावी शिक्षणांसाठी लाखो रुपये खर्च येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची इच्छा असतांनाही त्यांना आयआयटीत प्रवेश घेता येत नाही.

Web Title: 534 students will attend the 'Super 30' test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.