५४ उमेदवार निवडणूक लढविण्यास अपात्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 09:03 PM2017-09-18T21:03:18+5:302017-09-18T21:05:28+5:30

नगरपालिका निवडणूक लढविणाºया ५४ उमेदवारांना निवडणूक खर्च सादर न करणे चांगलेच महागात पडले. नगरपालिका प्रशासनाने जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन येथील ५४ उमेदवारांना तीन वर्षांकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे.

54 candidates ineligible to contest the election! | ५४ उमेदवार निवडणूक लढविण्यास अपात्र !

५४ उमेदवार निवडणूक लढविण्यास अपात्र !

googlenewsNext
ठळक मुद्देजालना जिल्ह्यात खळबळ तीन वर्षांकरिता बंदी 

जालना : नगरपालिका निवडणूक लढविणाºया ५४ उमेदवारांना निवडणूक खर्च सादर न करणे चांगलेच महागात पडले. नगरपालिका प्रशासनाने जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन येथील ५४ उमेदवारांना तीन वर्षांकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. सोमवारी हा निर्णय घेण्यात आला. याबाबत गॅझेटमध्ये नोंद करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.
जिल्ह्यात मागील वर्षी जालना, परतूर, अंबड व भोकरदन नगरपालिकेच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. नगरसेवक पदाचे स्वप्न पाहणाºया शेकडो उमेदवारांनी अर्ज भरले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला बँकेत स्वतंत्र खाते उघडून दररोज निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. असे असतानाही काही उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नाही. अशा अनेक उमेदवारांना नगरपालिका प्रशासनामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर बहुतांश उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे खर्च सादर केला. मात्र, ५४ उमेदवारांनी वारंवार सूचना देऊनही निवडणूक खर्च सादर करण्यास टाळाटाळ केली. या सर्वांना नगरपालिका प्रशासनाने निवडणूक विभागाच्या नियमानुसार खर्च सादर न केल्यामुळे आपणास निवडणूक लढविण्यास अपात्र का ठरवू नये, या आशयाची नोटीस पाठवून आपली बाजू मांडण्यचे सांगण्यात आले होते. मात्र, संबंधित उमेदवारांनी याकडेही दुर्लक्ष केले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार ५४ उमेदवारांना तीन वर्षांकरिता कुठलीही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरिवण्यात आले आहे.
एक विद्यमान नगरसेविका
अपात्र ठरविण्यात आलेल्या ५४  उमेदवारांव्यतिरिक्त जालना नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ३० मधील एका महिला नगरसेविकेनेही आपला निवडणूक खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे सदर नगरसेविकेला अपात्र का ठरवू नये, अशी नोटीस नगरपालिका प्रशासनाने दिली आली आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांच्या दालनामध्ये मंगळवारी अंतीम सुनावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
-----------
नोटीस देऊनही बाजू मांडली नाही
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक लढविणाºया प्रत्येक उमेदवाराला दररोज खर्च सादर करणे बंधनकारक आहे. पालिका निवडणुकीचा खर्च सादर न करणाºया ५४ उमेदवारांना प्रशासनाने नोटिसा दिल्या होत्या. नोटीस दिल्यानंतरही दिलेल्या वेळेत आपली बाजू न मांडणाºया उमेदवारांवर कारवाई करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. 
- शिवाजीराव जोधंळे, जिल्हाधिकारी, जालना.

Web Title: 54 candidates ineligible to contest the election!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.