कुंभारझरी परिसरात शॉटसर्किटमुळे ६० एकरमधील ऊस जळून २१ शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 06:21 PM2019-01-07T18:21:48+5:302019-01-07T18:25:01+5:30

कुंभारझरी परिसरातील एका शेतात सोमवारी सकाळी अचानक आग लागली.

60 acres of sugarcane crop burnt due to short circuit; 21 farmers loss at Kumbharjhari | कुंभारझरी परिसरात शॉटसर्किटमुळे ६० एकरमधील ऊस जळून २१ शेतकऱ्यांचे नुकसान

कुंभारझरी परिसरात शॉटसर्किटमुळे ६० एकरमधील ऊस जळून २१ शेतकऱ्यांचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देकुंभारझरी येथील घटना२१ शेतकऱ्यांचे ५० लाख रुपयांचे नुकसान

जाफराबाद (जालना ) : जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील एका शेतात शॉटसर्किटमुळे अचानक आग लागली. यात लागून असलेल्या २१ शेतकऱ्यांचा ६० एकर ऊस जळाला. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.

कुंभारझरी परिसरातील एका शेतात सोमवारी सकाळी अचानक आग लागली. आग लागताच शेतकऱ्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगेने रुद्ररुप धारण केले. त्यानंतर देऊळगाव राजा व भोकरदन येथील अग्निशमन दलाचे बंब बोलविण्यात आले होते. या आगेत जवळपास ६० एकर ऊस जळून खाक झाला असून, यात शेतकऱ्यांचे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

यात गजानन  चव्हाण, प्रयाग चव्हाण, पार्वताबाई चव्हाण, दुर्गा चव्हाण, माधव चव्हाण,  प्रकाश चव्हाण, शरद चव्हाण, मनोहर चव्हाण, नामदेव चव्हाण, हरिभाऊ चव्हाण, दामुता चव्हाण, सुभाष चव्हाण, अशोक चव्हाण, रामकृष्ण चव्हाण, राजाराम चव्हाण,  साहेबराव चव्हाण, जगन चव्हाण, अनिता चव्हाण, यासह अन्य शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती सरपंच संजय चव्हाण यांनी दिली आहे.

Web Title: 60 acres of sugarcane crop burnt due to short circuit; 21 farmers loss at Kumbharjhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.