जालना जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचा ६० हजारांचा टप्पा, २४८ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 07:08 PM2020-10-15T19:08:58+5:302020-10-15T19:11:06+5:30
coronavirus news जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, मध्यंतरी सदोष कीटसमुळे पॉझिटीव्ह येणाऱ्यांचे प्रमाण घसरले होते.
- संजय देशमुख
जालना : जिल्ह्यात गेल्या मार्च महिन्यापासून जवळपास ३१ हजार ३८५ या आरटीपीसीआर तर जवळपास २८ हजार ५५९ अँटीजन चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत जवळपास २४८ जणांना कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, मध्यंतरी सदोष कीटसमुळे पॉझिटीव्ह येणाऱ्यांचे प्रमाण घसरले होते. परंतु नवीन कीटस मागविल्यानंतर यात आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यत ९ हजार ४४६ जणांनी कोरोनाची लागण झाली असून, ७ हजार ३८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ४ हजार ३९७ खाटांची संख्या उपलब्ध असून यातील अलगीकरणातील बेडची संख्या ही १९६४ असून ऑक्सिजनचा थेट पुरवठा करता येणाऱ्या ३८६ खाटा आहेत. तर आयसीयुमध्ये एकूण १८९ खाटा आहेत. जिल्ह्यात एकूण ११३ व्हेंटिलेटर आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०.४ टक्के असून रुग्णालयातील सुटी झालेल्यांचे प्रमाण ७७.३६ टक्के आहे. जिल्ह्यात २४८ जणांचा मृत्यू झाला असून याची टक्केवारी २.६० एवढी येते. जालना शहरात ३ हजार ९७८ रुग्ण आढळून आले असून, याची टक्केवारी ४२ टक्के आहे. तर ग्रामीण ४ हजार ३१३ रुग्ण असून याची टक्केवारी ४५ टक्के आहे. कोरोनाची लागण होणाऱ्पुांधध्ये पुरूषांचे प्रमाण जास्त आहे. १४ ऑक्टोबरपर्यंत जवळपास ५ हजार ९५४ पुरूष तर ३ हजार ५९२ महिलांना कोरोना झाला आहे.
तालुकानिहाय मृत्यू झालेल्यांची संख्या अशी आहे : यात अंबड २४, भोकरदन ९, घनसावंगी ११, जाफराबाद १०, जालना १४२, परतूर ७, बदनापूर ४, मंठा ३ असा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ३० जणांचाही जालना जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.
२२ लाख ११ हजार जणांची तपासणी
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत आतापर्यंत २२ लाख ११ हजार ७३६ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यात जवळपास ४९ हजार ४४७ कुटुंबाचा समावेश आहे. यासाठी एकूण ९८३ पथकांची स्थापना करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून ही तपासणी केली जात आहे.