पाचवीच्या ६६८०, तर आठवीच्या ४३०६ मुलांनी दिली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:33 AM2021-08-13T04:33:57+5:302021-08-13T04:33:57+5:30

जालना : जिल्ह्यातील १२२ केंद्रांवर पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. यात पाचवीच्या ७२६१ नोंदणीकृत परीक्षार्थींपैकी ६६८० ...

6680 fifth graders and 4306 eighth graders appeared for the exam | पाचवीच्या ६६८०, तर आठवीच्या ४३०६ मुलांनी दिली परीक्षा

पाचवीच्या ६६८०, तर आठवीच्या ४३०६ मुलांनी दिली परीक्षा

Next

जालना : जिल्ह्यातील १२२ केंद्रांवर पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. यात पाचवीच्या ७२६१ नोंदणीकृत परीक्षार्थींपैकी ६६८० जणांनी परीक्षा दिली, तर आठवीच्या नोंदणीकृत ४८२० जणांपैकी ४३०६ जणांनी परीक्षा दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १२२ केंद्रांवर पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. यामध्ये पाचवीची ७३ केंद्रे, तर आठवीची ४९ केंद्रे करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करून या परीक्षा घेण्यात आल्या. केंद्रावरील परीक्षार्थींसह निरीक्षकांची तपासणी करूनच त्यांना केंद्रावर सोडण्यात आले. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून ७२६१ मुलांची नोंदणी करण्यात आली होती. पैकी ६६८० जणांनी परीक्षा दिली. यात जालना तालुक्यातील १४०२, भोकरदन- ९२३, अंबड- १३३०, परतूर- ५२०, जाफराबाद- ५१५, बदनापूर- ९१४, घनसावंगी- ५९९, तर मंठा तालुक्यातील ४७७ मुलांनी पहिला पेपर दिला, तर दुसरा पेपर ६६७५ जणांनी दिला. यात जालना तालुक्यातील १४०१, भोकरदन- ९२३, अंबड- १३३०, परतूर- ५१९, जाफराबाद- ५१४, बदनापूर- ९१५, घनसावंगी- ५९८, तर मंठा तालुक्यातील ४७५ मुलांनी दुसरा पेपर दिला.

आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून ४८२० मुलांनी नोंदणी केली होती. पैकी ४३०६ मुलांनी पहिला पेपर दिला, तर ४३३१ मुलांनी दुसरा पेपर दिला. यात जालना तालुक्यातील १०६३, भोकरदन- ६६४, अंबड ७९२, परतूर- २६९, जाफराबाद ३३३, बदनापूर- ५६०, घनसावंगी ३३१ व मंठा तालुक्यातील २९४ मुलांनी पहिला पेपर दिला, तर जालना तालुक्यातील १०६१, भोकरदन- ६६४, अंबड ७९२, परतूर- २६८, जाफराबाद ३३३, बदनापूर- ५८८, घनसावंगी ३३१ व मंठा तालुक्यातील २९४ मुलांनी दुसरा पेपर दिला. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित केंद्रांतील प्रमुखांसह शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

१०९५ मुलांची अनुपस्थिती

शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवी व आठवीच्या १०९५ मुलांची अनुपस्थिती होती. यात पाचवीच्या पहिल्या पेपरला ५८१ जणांची, तर दुसऱ्या पेपरला ५८६ जणांची अनुपस्थिती होती, तर आठवीच्या पहिल्या पेपरला ५१४ जणांची व दुसऱ्या पेपरला ४८९ जणांची अनुपस्थिती होती.

फोटो कॅप्शन : जालना शहरातील सेंट मेरी केंद्रावर पाहणी करताना शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ व इतर.

Web Title: 6680 fifth graders and 4306 eighth graders appeared for the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.