पाणी पुनर्वापरासाठी ६७ कोटींचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:25 AM2020-12-25T04:25:35+5:302020-12-25T04:25:35+5:30
हा प्रकल्प उभारल्यास यातून जालन्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी जवळपास २० एमएलडी. पाणी शुध्द करता येणार आहे. त्याचा वापर हा ...
हा प्रकल्प उभारल्यास यातून जालन्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी जवळपास २० एमएलडी. पाणी शुध्द करता येणार आहे. त्याचा वापर हा येथील उद्योगांसाठी तसेच शेतीसाठी वापरता येणार आहे. यातून पाणी टंचाईवरही मोठी मात होणार आहे. जालन्यातील स्टील उद्योगाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज पडते. आजही हा उद्योग येथील वेगवेगळ्या विहिरींमधून टँकरव्दारे पाणी आणून चालू आहे. त्यामुळे पालिकेने जर लवकरात लवकर हा प्रकल्प प्रत्यक्षात आणल्यास याचा मोठा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.
जालना पालिकेने या प्रकल्पा प्रमाणेच घनकचरा प्रकल्पा बाबतही आता हालचाली तीव्र केल्या आहेत. सामनगाव येथील घनकचरा प्रकल्प मंजूर असून, तो देखील अनेक कारणांमुळे लांबणीवर पडला आहे. या प्रकल्पातून कचऱ्यापासून जैविक खताची निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि जालना पालिका तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून साधारणपणे ११ वर्षापासून सुरू आहे. पुणे येथील एका कंपनीला हे काम दिले होते. परंतु नंतर हे काम त्यांच्याकडून काढून घेत दुसऱ्या कंपनीला दिले असल्याचे सांगण्यात आले.
घंटागाड्यांची डोकेदुखी
जालना शहरातील विविध प्रभागातून घंटागाड्यातून कचरा संकलन केले जाते. परंतु जवळपास १५ पेक्षा अधिक घंटागाड्या नादुरूस्त असून, त्याच्या दुरूस्तीसाठी आम्ही प्रयत्न करत असल्याची माहिती मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली.