शेतकऱ्यांना ७२० कोटींची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:00 AM2018-06-13T01:00:21+5:302018-06-13T01:00:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांची कर्जमाफी देण्यासह पीकविमा तसेच ठिबक सिंचनाचे अनुदान , औजारे खरेदी, अस्तरीरकरण तसेच अन्य अनुदानाच्या माध्यमातून गेल्या सहा ते सात महिन्यात शेतकºयांना जवळपास ७२० कोटी रूपयांचे अनुदान मिळाले आहे.
दुष्काळाच्या फे-यातून शेतक-याला सावरण्यासाठी शासनाकडून अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यात सर्वात महत्वाची आणि महत्त्वपूर्ण ठरलेली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना होय. या योजनेतून जालना जिल्ह्यातील एक लाख २३ हजार शेतकºयांना जवळपास ५९३ कोटी ६३ लाख रूपये शेतक-यांच्या खात्यावर जमा झाले असून, दीड लाख रूपयां पर्यंतचे कर्जमाफ करण्यात आले आहे.
कर्जमाफी योजनेसह ठिबक सिंचनाचे जवळपास ५२ कोटी रूपये अनुदान मिळाले असून, ते शेतक-यांना दिले आहे. शेडनेटसाठीचे दोन कोटी रूपये मिळाले आहेत. शेती अवजारे खरेदीसाठी ११ कोटी मिळाले आहेत.