‘स्वच्छता दर्पण’साठी ७७९ ग्रा.पं.सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:52 AM2019-07-31T00:52:16+5:302019-07-31T00:52:18+5:30

स्वच्छता दर्पण’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी ७७९ ग्रा.पं. सज्ज झाल्या आहेत.

779 grampanchayats ready for for 'cleaning mirror' | ‘स्वच्छता दर्पण’साठी ७७९ ग्रा.पं.सज्ज

‘स्वच्छता दर्पण’साठी ७७९ ग्रा.पं.सज्ज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ‘स्वच्छता दर्पण’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी ७७९ ग्रा.पं. सज्ज झाल्या आहेत. गावातील सर्व कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छाग्रहींच्या मदतीने जनजागृती, स्वच्छाग्रहींना प्रशिक्षण व घनकचरा सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे हे उपक्रम प्रामुख्याने तपासण्यात येणार आहेत.
शाश्वत स्वच्छतेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून जनजागृती करण्यावर जिल्ह्याचे गुणांकन होणार आहे.
राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता दर्पण ही गुणांकन स्पर्धा असून ३० जुलैपर्यंत सर्वांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, शौचालयाचा वापर शाश्वत स्वच्छतेसाठी स्वच्छाग्रही यांची निवड प्रशिक्षण व स्वच्छागृह सक्रिय करणे याबाबी या स्पर्धेसाठी महत्त्वाच्या असून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत गावात जनजागृती करण्यासाठी रंगरंगोटी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
‘हगणदारीमुक्त गावात आपले स्वागत’ अशा आशयाचे स्वागत फलक व लहान मुलांच्या शौचाचे व्यवस्थापन, शौचालयाचा वापर, शौचालय सर्वांसाठी तसेच घनकचरा व्यवस्थापन हे ४ महत्वाचे चित्रसंदेश गावात रंगवणे गरजेचे आहे.
केंद्र शासनाने दिलेला नमुना आकार रंगसंगती प्रमाणे एक स्वागत फलक व चार भिंती रंगवावे. अ‍ॅपच्या मदतीने फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. या आधारेच गुणांकन करण्यात येणार आहे. यासाठी २० गुण आहेत. या कामासाठी व स्वागत फलक तयार करण्यासाठी ७७९ ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करुन दिला जात आहे.
ग्रामसेवक व सरपंच तसेच गावातील पाच महिलांच्या स्वाक्षरीने रंग कामाचा अहवाल पंचायत समितीस दाखल होताच संबंधित ग्रामपंचायतींच्या खात्यावर रंगकामाचा निधी वितरित करण्यात येणार आहे. यासाठी जिओ टॅगिंग महत्त्वाची आहे. रंग काम पूर्ण करून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर फोटो अपलोड करावयाचा आहे. ग्रामसेवक, सरपंच व देखरेख समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन आपले गाव व ग्रामपंचायत राष्ट्रीय स्तरावर गुणांकनात अव्वल आणण्याचे हे प्रयत्न आहेत.
८१ ग्रामपंचायतींचा समावेश
या स्पर्धेत जालना तालुक्यातील १२४, अंबड तालुक्यात १११, बदनापूर ७९, भोकरदन १२४, घनसावंगी ९६, जाफराबाद ७२, मंठा ९२, परतूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आता खऱ्या अर्थाने चुरस निर्माण होणार आहे.

Web Title: 779 grampanchayats ready for for 'cleaning mirror'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.